साधनेचा (ईश्‍वरप्राप्तीचा) मार्ग आणि हिंदु राष्ट्राची पहाट दर्शवणार्‍या कु. आरती सुतार यांनी रेखाटलेल्या चित्राचा भावार्थ

कु. आरती सुतार

१. एका घराची खिडकी बंद आणि दुसर्‍या घराची खिडकी उघडी असणे

​‘प्रत्येक गोष्टीला २ बाजू असतात, उदा. बाह्य मन आणि अंतर्मन, नकारात्मक आणि सकारात्मक, अप्रामाणिक आणि प्रामाणिक आदी. जसे देवाने आपल्याला ओळखले आहे, तसे आता आपल्यालाही देवाला ओळखून देवाला अपेक्षित असे प्रयत्न करायचे आहेत.  साधनेत अनेक अडचणी येतात; पण त्यांना न घाबरता पुढे गेले पाहिजे. मनाचे दार नेहमी नकारात्मक विचारांसाठी बंद ठेवले पाहिजे आणि सकारात्मक विचारांसाठी उघडे ठेवले पाहिजे.

२. आशीर्वाद देणारा देवाचा हात

देवाच्या आशीर्वादाविना कोणतीही गोष्ट शक्य होत नाही; म्हणून सातत्याने साधना करावी लागते.

३. हिंदु राष्ट्राची पहाट दर्शवणारा सूर्य

सूर्य उगवला असून एकीकडे हिंदु राष्ट्राची पहाट होत आहे. वातावरणात चैतन्य वलय आणि कण पसरत आहेत.

४. ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग

​साधनेच्या मार्गात चिखल, दगड, फुलांचे काटे, शिडी, मनाचा संघर्ष आणि प्रशिक्षणवर्ग येतो. या मार्गातून गेल्यावर देव साधकाच्या स्वागतासाठी आतुरतेने हात पुढे करत असल्याचे दिसत आहे.

४ अ. चित्राचा भावार्थ

१. साधना करतांना आपण चिखलात पडलेच पाहिजे, नाहीतर अहंकाराचा नाश कसा होणार ?
२. दगडाला आपटलेच पाहिजे, नाहीतर सहन कसे करायला शिकणार ?
३. फुलांना स्पर्श करतांना काटे टोचलेच पाहिजेत, नाहीतर सकारात्मकता कशी वाढणार ?
४. शिडीवरून घसरलेच पाहिजे, नाहीतर मागे ज्या काही चुका केल्या त्या लक्षात कशा येणार ?
५. मनाचा संघर्ष झालाच पाहिजे, नाहीतर देवाची आठवण कशी येणार ?
६. सर्व गोष्टींना सामोरे जाऊन विजय झालाच पाहिजे आणि कर्तेपणा देवाचरणी अर्पण केला पाहिजे, नाहीतर देव आपले स्वागत कसे करणार ?

– सतत घडण्यासाठी तळमळणारी,
कु. आरती सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.४.२०१६)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक