प्रदर्शन आवरतांना तेथे ठेवलेला आरसा हलणे, त्या माध्यमातून तो साधिकेशी बोलत असल्याचे आणि तिच्याकडे पहात असल्याचे जाणवणे

कु. आरती नारायण सुतार

‘मी रात्री जतनविषयी प्रदर्शन आवरण्याच्या सेवेसाठी गेले. तेव्हा तेथील आरसा आपोआप हलू लागला. मी २ मिनिटे त्याच्याकडे बघतच राहिले. त्याला कुणीतरी हात लावल्याप्रमाणे तो हलत होता. ते पाहून मला पुष्कळ आनंद झाला. मी आज प्रथमच त्याला अशा प्रकारे हलतांना पाहिले. मी ज्या दिशेने जायचे, त्या दिशेने आरसा फिरायचा. मी प्रदर्शन आवरतांना माझे प्रतिबिंब आरशात दिसत होते. मला आश्‍चर्य वाटत होते; कारण मी नेहमी प्रदर्शन आवरतांना कृष्णाशी बोलत आवरत असे. ‘आरसा म्हणजे माझा कृष्ण आहे’, असा भाव ठेवून प्रदर्शन आवरतांना कृष्णाशी खेळायचे. मी पुनःपुन्हा त्या आरशामध्ये बघायचे आणि आरसा (कृष्ण) दुसर्‍या बाजूने बघायचा. त्यामुळे कृष्ण जिंकत असे आणि मी हरत असे; पण आज उलटच झाले. आरसा माझ्याकडे बघायला लागला आणि मी आरशाकडे, म्हणजेच कृष्णाकडे बघू लागले. त्याला मी घरून आल्याचा पुष्कळ आनंद झाला होता. तो आरशाच्या हलण्यातून व्यक्त होत होता. त्याच्या आनंदात मी सहभागी झाल्याने सेवा चांगली झाली.’

– कु. आरती नारायण सुतार (१५.१.२०१५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक