बिंदूदाबनाचे उपचार केल्यावर कु. आरती सुतार यांना जाणवलेले पालट

बिंदूदाबन

१. आधुनिक वैद्यांनी उपचार करूनही हात आणि मान यांचे दुखणे न्यून न होणे

‘१ – २ वर्षांपासून माझे हात आणि मान दुखत आहे. याचे अद्याप कारण समजले नाही. मी अनेक आधुनिक वैद्यांकडे गेले. त्यांनी सांगितलेले सर्व उपचार केले. प्रत्येक आधुनिक वैद्य वेगवेगळे उपचार सांगत होते. १ – २ उपचारांनी अल्पसा पालट व्हायचा; मात्र फारसा लाभ होत नसे.

कु. आरती सुतार

२. बिंदूदाबनाचे उपचार केल्यावर शारीरिक त्रास उणावणे; पण २ घंट्यांनी पुन्हा दुखू लागणे 

श्री. विनायक आगवेकर यांनी माझ्यावर बिंदूदाबनाचे उपचार केले. त्या वेळी मला होणारे शारीरिक त्रास उणावले; पण २ घंट्यांनी मला पुन्हा दुखायला लागायचे. त्या वेळी मला दिवसातून २ – ३ वेळा बिंदूदाबनाचे उपचार करायला सांगितले होते; पण माझ्याकडून दिवसातून २ वेळाच उपचार व्हायचे.

३. सौ. अक्षता रेडकर यांनी अर्धा घंटा उपचार केल्यावर दिसून आलेले संमिश्र परिणाम

अ. बिंदूदाबनाचे उपचार चालू केल्यावर मला पुष्कळ ढेकरा येत असत. मला श्‍वास घ्यायला त्रास व्हायचा.

आ. माझ्या पोटात वेदना व्हायच्या.

इ. आरंभी माझे पोट नियमितपणे साफ व्हायचे; पण नंतर माझे पोट अनियमितपणे साफ होऊ लागले. पूर्वी मला पोट साफ होतांना वेदना व्हायच्या; पण आता मला वेदना होत नाहीत.

ई. सौ. अक्षता रेडकर यांनी माझ्यावर अर्धा घंटा उपाय केल्यावर त्याचा परिणाम १ – २ घंटेच जाणवायचा.

४. उपचार करतांना झालेले त्रास

अ. मला पुष्कळ वेदना व्हायच्या. देव मला वेदना सहन करण्याची शक्ती द्यायचा; पण काही वेळा मला वेदना सहन व्हायच्या नाहीत. मला रडू यायचे आणि डोळ्यांत पाणी आल्याने मला सर्दी व्हायची.

आ. माझे शरीर दुखायला लागायचे. मला थकवा जाणवायचा. मला चक्कर यायची. सर्दी झाल्याने मी थकून जायचे. मला पित्ताचा पुष्कळ त्रास व्हायचा. माझ्या शरिराला मुंग्या येण्याचे प्रमाणही वाढले होते.

इ. मला पुष्कळ वेळ झोप लागायची. मला भूक लागत नव्हती.

५. बिंदूदाबनाचे उपचार चालू केल्यावर पूर्वी न जाणवलेले त्रास उफाळून येणे

मी मनाने आणि शरिराने पूर्णपणे दमले होते. माझी शक्ती न्यून झाली. बिंदूदाबन उपचारांचा परिणामही फार वेळ टिकून रहात नव्हता.

६. बिंदूदाबनाचे उपचार केल्याने परिणाम अल्प असला, तरी ते नियमित केल्याने त्रास न्यून होऊन लवकर ठीक होणार असल्याचे सांगणे

मला होणारे त्रास मी श्री. विनायक आगवेकर यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘हे तुझे त्रास आधी दिसून येत नव्हते. आता उपचार चालू केल्याने ते दिसायला लागले. पूर्वी तुला त्रास समजत नसत. ते आता समजायला लागले आहेत. बिंदूदाबन उपचारांचा २ घंट्यांसाठी परिणाम दिसून येतो ना ? मग आता परिणाम ४ घंटे होण्यासाठी प्रयत्न करूया. हे उपचार प्रतिदिन केल्याने तुझे त्रास न्यून होऊन तू लवकर ठीक होशील. देवाने तुला आताच ठीक होण्याची संधी दिली आहे, तर त्याचा लाभ करून घे.’’

‘देवा, मी काहीच करू शकत नाही. तूच माझ्याकडून हे सर्व लिखाण करून घेतले आहेस. त्यासाठी कोटीशः कृतज्ञता ! मी सर्वकाही तुझ्या चरणी अर्पण करते.’

– कु. आरती नारायण सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१.२०१५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक