शेतकरी आंदोलन करणारे खलिस्तान समर्थक असून त्यांना आतंकवाद्यांकडून अर्थपुरवठा होतो !

अयोध्येतील तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास यांचा आरोप

केंद्र सरकारने महंत परमहंस दास यांच्या या आरोपाचे अन्वेषण करून देशाला वस्तूस्थिती काय आहे, हे सांगावे !

महंत परमहंस दास

अयोध्या (उत्तरप्रदेश) – देहलीच्या सीमेवर जे शेतकरी आंदोलन करण्यासाठी गोळा झाले आहेत, ते शेतकरी नाहीत, तर ते चीन, पाकिस्तान आणि आतंकवादी यांच्या इशार्‍यावर देश तोडणारे खलिस्तान समर्थक आहेत. या आंदोलनाला आतंकवाद्यांकडून अर्थपुरवठा करण्यात आला आहे, असा आरोप येथील तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास यांनी केला.

(सौजन्य : नवभारत टाइम्स)

महंत परमहंस दास यांनी गेल्या वर्षी १२ ऑक्टोबरला भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याच्या मागणीसाठी अयोध्येत आमरण उपोषणही चालू केले होते.