रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रम पहातांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील सौ. अनिता जमदाडे यांना आलेल्या अनुभूती 

१. ‘चारचाकी गाडीने रामनाथी आश्रमरूपी वैकुंठात जातांना ‘ब्रह्मांडातील पोकळीत जात आहे’, असे जाणवले आणि मला अतिशय आनंद झाला.

२. रामनाथी आश्रमाच्या स्वागतकक्षात असलेल्या श्रीकृष्णाच्या चित्रातील डोळ्यांत मला सूक्ष्मातून समुद्राप्रमाणे तरंग दिसत होते.

३. ‘सर्व विश्‍वातील तीर्थे इथेच आहेत’, असे मला वाटले.

४. सनातनचे बहुविकलांग अवस्थेतील संत पू. सौरभ जोशी यांना भेटल्यावर दैवी सुगंध येत होता.’

– सौ. अनिता संजय जमदाडे, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (१९.२.२०२०)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक