मुसलमान समाजाची दहा टक्के आरक्षणाची मागणी

नगर – मुसलमान समाजाची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थिती अतीमागास झाली आहे. त्यामुळे मुसलमान समाजाला दहा टक्के आरक्षण शिक्षण आणि नोकरी यांमध्ये द्यावे, तसेच ‘मुस्लीम आरक्षण कायदा’ महाराष्ट्रात लागू होईपर्यंत अध्यादेश काढून त्वरित आरक्षण लागू करावे, अशी मागणी ‘मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलना’च्या वतीने मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

‘मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलना’चे समन्वयक वहाब सय्यद आणि ‘काँग्रेस अल्पसंख्यांक सेल’चे प्रदेश उपाध्यक्ष फिरोज खान यांच्या शिष्टमंडळाने मंत्री वडेट्टीवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.