अनधिकृत बंदूक उपलब्ध करून देणार्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी !

सातारा, २३ डिसेंबर (वार्ता.) – अनधिकृत बंदूक आणि ४ जिवंत काडतुसे जवळ बाळगणार्या ३ जणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पुणे येथून आलेल्या या संशयितांकडील देशी बनावटीची १ बंदूक, ४ जिवंत काडतुसे, २ भ्रमणभाष संच, १ दुचाकी असा १ लाख १५ सहस्र ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत निवडणुका जवळ आल्यामुळे अनधिकृत शस्त्रांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिले आहेत. जावेद शेख, इरफान शेख आणि अमोल पाखरे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण