किन्नीगोळी, कर्नाटक येथील संत प.पू. देवबाबा यांनी शारीरिक त्रासांसाठी सांगितलेले उपाय

किन्नीगोळी, कर्नाटक येथील प.पू. देवबाबा यांचा २२ डिसेंबर या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी शारीरिक त्रासांसाठी सांगितलेले  उपाय येथे देत आहोत.

प.पू. देवबाबा

प.पू. देवबाबा यांना सनातन परिवाराकडून वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. पोटदुखी थांबण्यासाठी तोंडातील लाळ हे सर्वोत्तम औषध !

‘आपल्या तोंडातील लाळ हे पोटदुखीवरील सर्वोत्तम औषध आहे. पोट दुखत असल्यास आवळ्याचा तुकडा तोंडात धरावा. तो चावून खाऊ नये. तोंडात आवळा ठेवल्यावर सुटलेली लाळ गिळावी. त्यामुळे पोटदुखी थांबते. जर आवळा मिळाला नाही, तर एखाद्या फळाचा तुकडाही तोंडात धरू शकतो.

२. सांधेदुखीसाठी कपिला गायीचे शेण लावणे

शरिराच्या दुखणार्‍या भागावर कपिला गायीचे शेण लावावे. लेप लावतो, त्याप्रमाणे शेणाचा जाड थर लावावा. नंतर ते शेण पडू नये; म्हणून त्यावर कापड बांधावे आणि ते ६ घंटे ठेवावे. हे दिवसाही लावू शकतो. असे ७ दिवस नियमित करावे. नंतर १ आठवडा लावू नये. त्यानंतर पुन्हा ७ दिवस लावावे. हा उपाय आपण गुडघेदुखी, डोकेदुखी इत्यादींवरही करू शकतो.

कपिला गायीचे शेण मिळाले नाही, तर इतर देशी (विदेशी नाही) गायींचे शेणही लावू शकतो. त्या शेणाचाही कपिला गायीच्या शेणाएवढा नाही; पण लाभ होतो.’

– प.पू. देवबाबा, किन्नीगोळी, कर्नाटक. (जुलै २०१९)

गुडघेदुखीसाठी उपाय केल्यावर आलेली अनुभूती

‘प.पू. देवबाबांनी सांगितल्याप्रमाणे मी सलग १२ दिवस माझ्या दुखत असलेल्या गुडघ्याला शेण लावले. त्यामुळे माझ्या गुडघ्याला आलेली सूज काही प्रमाणात न्यून झाली.’ – कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक