कराड भाजी मंडई येथील खून प्रकरण

कराड, १८ डिसेंबर (वार्ता.) – येथील भाजी मंडई परिसरात १५ डिसेंबरच्या रात्री जुबेर आंबेकरी या युवकाचा धारदार शस्त्राने आणि डोक्यात फरशी घालून खून करण्यात आला होता. खुनानंतर मारेकरी पसार झाले होते. पोलिसांनी अन्वेषण केल्यानंतर विधीसंघर्ष बालकांसह (विशिष्ट परिस्थितीत गुन्हा करणार्या मुलाला कायद्याच्या प्रकियेतून जाणे अनिवार्य असते. अशा मुलांना कायद्यात ‘विधीसंघर्षग्रस्त मूल’ असे म्हटले जाते.) परराज्यात पलायन करण्याच्या सिद्धतेत असलेल्या ३ संशयितांना कह्यात घेतले. यापैकी सईद अल्ताफ शिकलगार हा एम्आयएम्चे जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकलगार यांचा मुलगा आहे.
संशयित आरोपी १७ डिसेंबर या दिवशी सकाळी महामार्गावरून कर्नाटक राज्यात पलायन करण्याच्या सिद्धतेत होते. पोलिसांनी सापळा रचून ३ संशयितांना कह्यात घेतले. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून हे कृत्य केले असल्याचे प्राथमिक अन्वेषणात निष्पन्न झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.
हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
Fake Currency Racket : कर्नाटक : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात