
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापिठे यांमध्ये होणार्या सक्तीच्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी राज्यपाल सचिवालयाने सर्व उच्चशिक्षण संस्थांना ‘कट्टरतावादविरोधी कक्ष’ स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. कुलगुरूंचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर एम्. बोबडे यांनी प्रसारित केलेल्या पत्रानुसार आमिषे किंवा मानसिक दबाव यांद्वारे विद्यार्थ्यांचे धर्मांतर केले जात असल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त झाल्या आहेत. हे अस्वीकारार्ह आहे. त्यामुळे विद्यार्थी कल्याण कक्ष आणि कट्टरतावादविरोधी यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. या घटनांत दोषी आढळणार्यांविरुद्ध धर्मांतरबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. यासह विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी मार्गदर्शक सत्रे, पालक-शिक्षक बैठका आणि चर्चासत्रे यांचे आयोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
हुतात्मा विक्रम चव्हाण यांच्यावर शासकीय पद्धतीने अंत्यसंस्कार !
ग्राहकांना प्रतिदिन मिळणार अधिकाधिक २०० लिटर डिझेल !
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६’चा मसुदा म्हणजे देवभूमीचे खासगीकरण आणि देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला !
महंमद समीर याने विद्यार्थिनीला गर्भपाताच्या बर्याच गोळ्या बलपूर्वक दिल्याने तिचा मृत्यू !
Mahalakshmi Kolhapur Suvarna Kalash : श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या शिखरावर सुवर्ण कळस बसवला !
कर्नाटकात काँग्रेसकडून भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांविरुद्ध पोलिसांत तक्रार