‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग आणि नामजप सत्संग यांचा लाभ घेणार्‍या मुंबईतील जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

१. श्री. राजीव नायडू, इंग्रजी वाचक, मुलुंड पश्‍चिम, मुंबई.

अ. ‘ऑनलाईन बालसंस्कार’ या सदरांतर्गत ‘शांत निद्रा’ हा लहान मुलांशी संबंधित असलेला भाग पुष्कळ चांगला होता. सत्संगात सांगितले जात असलेल्या लहान लहान गोष्टी मुलांना फारच आवडतात. (२५.५.२०२०)

आ. ‘शरणागती भाग २’ उत्कृष्ट होता. सध्याच्या आधुनिक जगातील लोकांची वृत्ती अस्थिर आणि दिखाऊपणाची होत चालली आहे. त्यांच्यासाठी हा चिंतनाचा विषय आहे, तसेच लहान मुलांना योग्य विचारांकडे वळवणे आवश्यक आहे. (३१.५.२०२०)

इ. ‘देव्हार्‍यातील देवतांची मांडणी’ हा भागही पुष्कळ चांगला होता. ‘वास्तु’ आणि ‘कलश’ यांविषयीची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. आधुनिक विचारसरणीमुळे लोक वास्तूकडे दुर्लक्ष करत आहेत. (५.६.२०२०)

ई. ‘पूजेच्या साहित्याची रचना कशी असावी ?’, याविषयीची माहिती उद्बोधक होती. मी या ‘ऑनलाईन बालसंस्कारवर्गा’ची ‘लिंक’ माझ्या अनेक मित्रांना प्रतिदिन पाठवत आहे.’ (१२.६.२०२०)

२. राधा वेंकटरमण, इंग्रजी वाचक, मुलुंड, मुंबई.

‘८.७.२०२० या दिवशीचे दोन्ही सत्संग फारच छान होते. ते ऐकल्यापासून आमचा आत्मविश्‍वास वृद्धींगत होत आहे. नामजपाच्या सत्संगामध्ये ‘नमस्कार करण्याची योग्य पद्धत’ या सदरामध्ये नमस्कार करण्याच्या अयोग्य पद्धतींविषयीची माहिती उद्बोधक होती. ती माहिती सर्वांसाठीच उपयुक्त आहे.’

३. प्रा. शक्ती अवस्थी, प्रोफाईल मेंबर, चेंबूर

‘मला सर्वच सत्संग आवडतात. हे सत्संग सात्त्विक लोक प्रस्तुत करत असल्यामुळे ते अधिक भावतात.’