सौ. प्रतिभा फलफले यांनी त्यांना साधनेत साहाय्य करणार्या पुणे जिल्ह्यातील ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. मनीषा पाठक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत केलेली कविता पुढे दिली आहे.

मनीषाताई, तू आई आम्हा लेकरांची (टीप १) ।
जाणीव करून देतसे तू आम्हाला ध्येयाची ॥ १ ॥
‘आम्ही साधनेत पुढे जावे’, ही तळमळ असे तुला ।
शिकवशी आम्हा कृतीला भावाची जोड द्यायला ॥ २ ॥
अखंड प्रयत्न असती तुझे आम्ही घडावे यासाठी ।
आम्हाला देशी तू साधनेचे धडे पुढे जाण्यासाठी ॥ ३ ॥
प्रतिनिधी असशी तू गुरुदेवांची ।
क्षणोक्षणी प्रीती देशी तू माऊलीची ॥ ४ ॥
आमच्या मनाची स्थिती ठाऊक असे तुला ।
जसे माऊलीच जाणते लेकरांच्या अंतर्मनाला ॥ ५ ॥
तुझ्यासारखे गुण आत्मसात करता येऊ देत आम्हाला ।
तुझ्यासारखे भावमय होता येऊ दे आम्हाला ॥ ६ ॥
आमच्यामध्ये तळमळ निर्माण होऊ दे पालटण्याची ।
हीच प्रार्थना आहे गुरुचरणांसी आमची ॥ ७ ॥
टीप : लेकरांची – जिल्ह्यातील साधकांची
– सौ. प्रतिभा फलफले, पुणे (४.४.२०२०)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
गुरूंना अपेक्षित अशी भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा होण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करणारे दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. शांताराम मांडवकर !