चीनने डोकलामजवळ सैन्य आणि दारुगोळा ठेवण्यासाठी बंकर बांधले

चीनला जशास तसे उत्तर दिल्यावरच त्याच्या कुरापती थांबतील !

बीजिंग (चीन) – चीनने भारतासाठी महत्त्वाच्या असणार्‍या डोकलाम भागाजवळ बंकर आणि रस्ते बांधले असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच चीनने भूतानच्या सीमेत घुसखोरी करत गाव वसवले असल्याचे समोर आले होते.

१. वर्ष २०१७ मध्ये भारत आणि चीन यांच्या सैन्यात झालेल्या वादाच्या ठिकाणीच चीनने सैन्य अन् दारूगोळा ठेवण्यासाठी बंकर बनवले आहेत. हे बांधकाम सिंचे-ला पासपासून जवळपास अडीच किमी अंतरावर आहे. उपग्रहातून काढण्यात आलेल्या छायाचित्रांतून ही माहिती मिळाली आहे.

२. उपग्रह छायाचित्रांचे विश्‍लेषक सिम टेक यांनी सांगितले की, चीनचा नवीन बंकर निर्मितीचा उद्देश स्पष्ट असून त्यांना या भागात स्वतःची शक्ती वाढवायची आहे. या भागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ हालचाल करून अधिक कुशलतेने लढाई करता येऊ शकते.