देवा सर्व कळे, हे मानवा न कळे ।
देवा ऐकू जाण्या कर्णकर्कश भजन म्हणे ॥ १ ॥
देव नाही बहिरा, अज्ञान्या कैसे कळे ।
मुंगी पायी घुंगराचा आवाजही त्यास कळे ॥ २ ॥
देव नाही आंधळा, सर्व त्याला दिसे ।
मांडवामागे (टीप १) गैरकृत्य का तू रे करितसे ॥ ३ ॥
देव अंतर्यामी सर्व त्यास कळे ।
वरवरचा ढोंगीपणा का तू रे करितसे ॥ ४ ॥
नव्हे केवळ पुतळा, देवाची ही मूर्ती ।
प्राणप्रतिष्ठा करूनी, सजीव झाली मूर्ती ॥ ५ ॥
‘भाव तेथे देव’, नको नुसते म्हणू ।
भाव निर्माण होण्या, साधना कर सुरू ॥ ६ ॥
प्रार्थितो तुला भगवंता, दे मानवा बुद्धी ।
जाणण्या तुझी शक्ती, करो तुझी भक्ती ॥ ७ ॥
टीप १ – सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, सत्यनारायण पूजा इत्यादी कार्यक्रमांच्या वेळी बर्याच मंडळांतील कार्यकर्ते मंडपाच्या मागील बाजूस रात्रभर पत्त्यांचा जुगार, मद्यपान करणे अशा अयोग्य कृती करतात.
– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.८.२०२०)