नुसरत जहाँ यांना जे वाटते ते सत्य असते, तर चांगलेच झाले असते; मात्र वस्तूस्थिती तशी नाही, याचा त्यांनी अभ्यास करावा !
कोलकाता (बंगाल) – प्रेम अतिशय वैयक्तिक गोष्ट आहे. ‘लव्ह’ आणि ‘जिहाद’ हातात हात घालून चालू शकत नाही. निवडणुकांच्या आधी लोक अशा प्रकारच्या विषयांना घेऊन समोर येतात. तुम्ही कुणासमवेत राहू इच्छिता ही एक वैयक्तिक निवड आहे. प्रेमात रहा आणि एकमेकांच्या प्रेमात पडणे चालू करा. धर्माला राजकारणाचे हत्यार बनवू नका, असे प्रतिपादन तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी केले आहे.
(सौजन्य : Hindustan Times)
बंगालमध्ये वर्ष २०२१ मध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लव्ह जिहाद’च्या सूत्रावरून बंगालमध्ये वाद चालू झाल्यामुळे जहाँ यांनी त्यावर त्यांचे मत मांडले. त्या पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. नुसरत जहाँ यांनी हिंदु तरुणाशी विवाह केला आहे. यापूर्वी भाजपने ‘सत्तेत आल्यास ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करू’, असे घोषित केले आहे.