ऋषिमुनींची ‘कृण्वन्तो विश्‍वम् आर्यम् ।’ म्हणजे ‘संपूर्ण विश्‍वाला आर्य, म्हणजेच सुसंस्कृत करू’ ही घोषणा सत्यात आणण्याची प्रतिज्ञा करा !

मुसलमान म्हणतात, ‘सर्व जग इस्लाममय करू.’ ख्रिस्ती म्हणतात, ‘या सहस्रकात सर्व जग येशूच्या पायांशी आणू.’ त्या दृष्टीने त्या दोघांचे प्रयत्नही चालू आहेत. हिंदू म्हणतात, ‘कृण्वन्तो विश्‍वम् आर्यम् ।’ (अर्थ : संपूर्ण विश्‍वाला आर्य, म्हणजे सुसंस्कृत करू.); पण कृती मात्र काहीच करत नाहीत. ही निष्क्रीयता हिंदूंच्या अस्तित्वावर घाला घालणारी आहे. हिंदूंनो, सन्मानाने जगायचे असेल, तर स्वतः धर्मशिक्षण घ्या आणि हिंदु धर्माचा प्रसार, हिंदुजागृती अन् धर्मरक्षण हा मार्ग अवलंबण्याची शपथ घ्या !