आपत्काळात रक्षण होण्यासाठी करावयाची प्रार्थना

सध्या कोरोनाच्या संकटकाळात आपण आपत्काळाची तीव्रता अनुभवतच आहोत. हा आपत्काळ दिवसेंदिवस अधिक भयावह होत जाणार आहे. अशा स्थितीत केवळ आणि केवळ भगवंतच आपले रक्षण करू शकतो. यासाठी प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे.

भगवान श्रीकृष्ण, ग्रामदेवता, स्थानदेवता आणि वास्तूदेवता यांना प्रत्येकी १५ मिनिटांनी किंवा अर्ध्या घंट्याने मनोभावे प्रार्थना करावी, ‘हे देवते, आम्ही तुला शरण आलो आहोत. तूच आम्हाला तारून ने. माझ्याकडून तुझा नामजप सातत्याने होऊ दे. मी, माझे कुटुंबीय आणि माझे घर यांच्याभोवती तुझ्या नामजपाचे संरक्षककवच निर्माण होऊ दे.’