नगर येथे महाविद्यालयीन तरुणीशी अश्‍लील चाळे करणार्‍या प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा नोंद

संगमनेर (नगर) – औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक आरशू पिरमोहम्मद पटेल याने बीड जिल्ह्यातून आलेल्या २१ वर्षांच्या विद्यार्थिनीशी अश्‍लील चाळे करून तिचा विनयभंग केला. तसेच मागील वर्षाच्या नोव्हेंबरपासून लगट करीत होता. त्याने विद्यार्थीनीचा भ्रमणभाष क्रमांक घेऊन त्यावरही अश्‍लील संदेश पाठवण्यास चालू केले होते. या प्रतिदिनच्या त्रासाला कंटाळून युवतीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. या प्राध्यापकाला पोलिसांनी अटक केली आहे. (असे वासनांध प्राध्यापक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार याचा विचारच न केलेला बरा ! अशा धर्मांधांना कठोर शिक्षा केल्यासच ते वठणीवर येतील ! – संपादक)