
नवी देहली – वृत्तपत्रांमुळे कोरोना पसरण्याचा धोका अत्यंत अल्प आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. ‘एक अशी वस्तू जी अनेक ठिकाणी प्रवास करून आपल्यापर्यंत पोचते. म्हणजेच एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जातांना ती वस्तू वेगवेगळ्या तापमानामधून, परिस्थितीतून प्रवास करते. त्यामुळे अशा वस्तूंमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अत्यंत अल्प आहे’, असे या संघटनेने म्हटले आहे. ‘वृत्तपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो’, असे वृत्त पसरल्याने या संघटनेने हे स्पष्टीकरण दिले आहे.
अमेरिकेतील एका वैद्यकीय संस्थेने सांगितले की, अनेकजण हाताळत असलेल्या वस्तूंपासून दूर रहाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यामुळे ‘वृत्तपत्रे आणि मासिके यांपासून लांब रहा’ असे सांगण्यात येत आहे; परंतु हा अपसमज असून तुमच्या घरी येणारे वृत्तपत्र पूर्णपणे सुरक्षित आहे. वृत्तपत्र निर्जंतुक केल्यानंतरच मुद्रणालयामधून वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठवले जात आहे. तसेच छपाईसाठीचे यंत्र पूर्णपणे स्वयंचलित आहेत. त्यामुळे वृत्तपत्रांमुळे कोरोना विषाणू पसरत नाही, असे स्पष्ट झाले आहे.
समष्टी स्तरावर अधर्माचा परिणाम, म्हणजे साथीचे रोग !
Hantavirus : हंता विषाणूच्या संक्रमणामुळे जगभरात चिंता !
देशाच्या विकासासाठी महिलांचा ५० टक्के सहभाग अत्यावश्यक ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मुंबई पोलिसांच्या कारवाईअभावी तक्रारदाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून अनुभवलेली गुरुकृपा !
अचानक मृत्यूमुखी पडण्यामागे कोरोना प्रतिबंधक लसीशी कोणताही संबंध नाही ! – AIIMS Study