
जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – कोरोना महामारीनंतर जगभरात हंता विषाणूविषयी चिंता वाढू लागली आहे. हा विषाणू उंदरांकडून माणसांमध्ये संक्रमित होतो. जगभरात आतापर्यंत याचे ८ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांपैकी ५ जणांमध्ये याची पुष्टी झाली आहे. यात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी या विषाणूमुळ २८ लोक मृत्यूमुखी पडले होते.
⚠️ Global concern rises over Hantavirus infection after the Corona pandemic
🦠 8 suspected cases reported worldwide; 5 confirmed, 3 deaths
🐀 Virus spreads from rats to humans
🚢 Outbreak linked to MV Hondius cruise ship heading to Spain
🌍 WHO issues alert to 12 countries,… pic.twitter.com/cws4RI7PlN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 8, 2026
१. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडनोम घेब्रेसस यांनी सांगितले की, ज्या ‘एम्.व्ही. होंडियस लक्झरी नौके’मधील प्रवाशांना या विषाणूची लागण झाली आहे, ती नौका सध्या आफ्रिका खंडातील केप वर्दे या देशात थांबल्यानंतर स्पेनच्या कॅनरी बेटाच्या दिशेने जात आहे.
२. स्पेनच्या आरोग्य मंत्रालयाने नौकेला थांबण्याची अनुमती दिली आहे. नौका ९ मे या दिवशी स्पेनच्या बंदरात पोचेल. यात उपस्थित ११० प्रवासी आणि कर्मचारी यांची सविस्तर पडताळणी होईल. नौकेलाला संसर्गमुक्त केले जाईल.
३. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार अमेरिका आणि कॅनडा या देशांसह १२ देशांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. या दोन्ही देशांचे ८० प्रवासी त्या नौकेत होते. २४-२५ एप्रिलला या नौकेतील प्रवासी त्या देशात परतले होते.
४. या नौकेमध्ये २ कर्मचारी भारतीय आहेत. त्यामुळे भारताचीही चिंता वाढली आहे.
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani