
१. अभ्यासू वृत्ती आणि प्रामाणिकपणा
‘अधिवक्ता संजीव पुनाळेकर हे मुंबई उच्च न्यायालयात कार्य करणारे एक प्रसिद्ध अधिवक्ता आहेत. ते हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव आहेत. ‘कायद्याचा प्रचंड अभ्यास आणि प्रामाणिकपणा’, या गुणांमुळे त्यांना व्यावसायिक यश अन् सन्मान मिळाला आहे; मात्र त्याचा लाभ त्यांनी कधी स्वतःपुरता मर्यादित ठेवला नाही.

२. सहकार्यांना महत्त्व देणे
२ अ. समाजोपयोगी विषय हाताळत असतांना त्यात मिळालेल्या यशाचे श्रेय सहकार्यांना देणे : अनेक समाजोपयोगी विषय हाताळत असतांना त्यांत मिळालेल्या यशाचे श्रेय त्यांनी स्वतःकडे घेण्याचे हेतूतः टाळले आहे. जेव्हा त्यांनी हाताळलेल्या विषयांसाठी प्रसारमाध्यमांसमोर जाण्याची वेळ येते, तेव्हा त्यांच्या समवेत असलेले सहकारी, साहाय्यक अधिवक्ता, हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांना ते माध्यमांसमोर पाठवतात. स्वकष्टाने मिळालेल्या यशापासून स्वतःला अलिप्त ठेवून समवेत असलेल्या सहकार्यांना मोठे करण्याचा दुर्मिळ गुण अधिवक्ता पुनाळेकर यांच्यात पहायला मिळतो. ‘निरपेक्ष आणि प्रामाणिक कार्य करण्याचा आनंद कोणत्याही प्रसिद्धीपेक्षा पुष्कळ मोठा असतो’, हे तत्त्व ते जगत आहेत.
२ आ. सहकार्यांचा आदर करणे : अधूनमधून होणार्या बैठकांमध्ये अल्प अनुभव असलेले कार्यकर्ते, सहकारी आणि साहाय्यक अधिवक्ता यांच्या मताचाही ते तितकाच आदर करतात, त्यांना महत्त्व देतात.
३. स्वतःकडे मोठेपणा न घेणे
ते वय, कार्यानुभव आणि साधना या सर्व गोष्टींत ज्येष्ठ आहेत; मात्र ते मोठेपण त्यांनी कधी मिरवले नाही. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेली व्यक्ती, मग ती सनातन परिवारातील असो, हिंदुत्वनिष्ठ असो किंवा समाजातील असो, त्या व्यक्तीच्या मनात अधिवक्ता पुनाळेकर यांच्याविषयी नितांत आदर असतो. त्यामुळेच त्यांच्या साहाय्यासाठी १० – १२ अधिवक्ते आजही एका घंट्यात उपस्थित होतात.
नम्रता आणि लढाऊ वृत्ती यांचा सुरेख संगम असलेले मुंबई येथील अधिवक्ता संजीव पुनाळेकर (वय ६० वर्षे)!

१. साहाय्यासाठी तत्पर : ‘हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर हे त्यांच्या संपर्कात येणार्या प्रत्येक व्यक्तीशी नेहमीच आदराने बोलतात. त्यांच्याकडे कधी कुणी कोणत्याही प्रकारचे साहाय्य मागितले, तर ते त्यासाठी सतत तत्पर असतात.
२. अधिवक्ता पुनाळेकर यांच्यात नम्रता आणि लढाऊ वृत्ती यांचा सुरेख संगम आहे.
३. काही दिवसांपूर्वी एक विनोद करतांना त्यांच्याकडून एका व्यक्तीचे मन दुखावले गेले. याविषयी त्यांनी माझ्या समोरच त्या व्यक्तीची न्यूनतम १० वेळा क्षमा मागितली.
४. सहकार्यांचे भरभरून कौतुक करणे : अधिवक्ता पुनाळेकर यांना त्यांच्या सहकार्यांना पुढे नेण्याची प्रचंड तळमळ आहे. ते कुणाचीही ईर्ष्या करत नाहीत. त्यामुळे त्यांना इतरांसमोर सहकार्यांचे भरभरून कौतुक करणे सहज शक्य होते.
५. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाच्या कार्यासाठी स्वतःला पणाला लावणे : राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाच्या कार्यात समोरील व्यक्ती कुणीही असो किंवा कुठल्याही संस्थेची असो, लहान असो अथवा मोठी असो, अधिवक्ता पुनाळेकर स्वतःला पणाला लावतात. तेथे ते स्वतःचा आणि परिणामांचा विचार करत नाहीत. ते प्रचंड कष्ट घेऊन आणि झोकून देऊन कार्य पूर्णत्वास नेतात. अशा प्रसंगांमध्ये त्यांना यश येते.
६. स्वतःच्या कुटुंबियांच्या त्यागाविषयी कृतज्ञ असणे : अधिवक्ता पुनाळेकर यांच्या समष्टी कार्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी अनेक संकटे सोसली आहेत. याविषयी त्यांच्या मनात कुटुंबियांप्रती पुष्कळ कृतज्ञता आहे. अधिवक्ता पुनाळेकर यांच्या कार्याला त्यांची पत्नी सौ. अनिता आणि मुलगी अधिवक्त्या (सौ.) ईशा देशपांडे यांचे पूर्ण सहकार्य असते. अनिताताई सर्व साधकांचे अतिशय प्रेमाने आदरातिथ्य करतात.
७. योग्य आध्यात्मिक दृष्टीकोन देणे : अधिवक्ता संजीव पुनाळेकर अनेक प्रसंगांत आध्यात्मिक दृष्टीकोन देतात. त्यांनी दिलेले आध्यात्मिक दृष्टीकोन सुस्पष्ट असतात. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीलाही कठीण प्रसंगाला सहजरित्या सामोरे जाता येते.
८. संतांप्रती भाव असणे : एप्रिल २०२६ मध्ये एका सोहळ्याच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. त्या वेळी ते एका वेगळ्याच भावावस्थेत होते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ घरी आल्याच्या प्रसंगाविषयी अन्य साधकांशी बोलतांना त्यांनी त्याचे अनेकदा भावपूर्णरित्या वर्णन केले. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा पिंड क्षात्रतेजाचा असला, तरी संतांशी किंवा एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीशी बोलतांना ते पुष्कळ नम्र असतात.
९. अधिवक्ता संजीव पुनाळेकर हे गुणांची खाण आहेत. त्यांच्यात ‘साधेपणा, कष्टाळूपणा, निर्मळता, बालकभाव, नेतृत्व, तळमळ, कृतज्ञताभाव’, अशी अनेक गुणवैशिष्ट्ये आहेत.’
– श्री. अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था. (२४.७.२०२६)
४. राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी जीवन समर्पित करणे
४ अ. राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी निःस्वार्थी, रोखठोक आणि निर्भीड भूमिका घेणे : अधिवक्ता पुनाळेकर यांचा प्रखर हिंदुत्ववाद आणि राष्ट्रवाद अनेक प्रकरणांत अनुभवायला मिळतो. राष्ट्र आणि धर्म यांसाठी भूमिका घेतांना त्यांची भूमिका रोखठोक अन् निर्भीड असते. त्यात त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो. राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करत असतांना अधिवक्ता पुनाळेकर यांनी लौकिकदृष्ट्या काही मिळवले नाहीच, उलट अधिक गमावलेच आहे. हिंदुत्वासाठी त्यांनी जे कार्य केले, त्याच्या बदल्यात कोणतीही व्यक्ती, संघटना किंवा समूह यांच्याकडून त्यांनी कधीही एका पैशाची अपेक्षा केली नाही. उलट असे कार्य करणार्यांसाठी त्यांनी स्वतःचे बहुमूल्य असे कित्येक घंटे दिले आहेत, तसेच आर्थिक साहाय्यही केले आहे. हिंदुत्वासाठी त्यांना कारावास भोगावा लागला. याचेही त्यांना कधी वैषम्य वाटले नाही.
गेल्या १५ – २० वर्षांत त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी दिलेल्या वेळेचे मूल्य करायचे झाले, तरी ते कल्पनातीत आहे. इतके असूनही काहीतरी गमावल्याची भावना त्यांच्या मनाला कधी शिवली नाही; कारण त्यांनी त्यांच्या जीवनाचे सार्थक पैसे, गाडी, बंगला यांच्या माध्यमातून कधी मोजले नाही.
४ आ. वडिलांच्या निधनाच्या प्रसंगीही धर्मकर्तव्याला प्राधान्य देणे : ‘राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी किती समर्पित जीवन जगले पाहिजे ?’, याचा आदर्श अधिवक्ता पुनाळेकर यांनी एका प्रसंगातून घालून दिला आहे. ४ विचारवंतांच्या हत्येनंतर काही हिंदुत्वनिष्ठांना अटक झाल्याचा तो काळ होता. प्रत्येक काही दिवसांनी पोलीस काही हिंदुत्वनिष्ठांना पकडून आणत आणि नंतर त्यांचा तपास, पोलीस ‘कस्टडी’ आणि त्यामुळे एका पाठोपाठ एक धडकणारी अनेक प्रकारची संकटे ! असा तो बिकट काळ होता. अधिवक्ता पुनाळेकर, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि त्यांचे सर्व सहकारी या संकटांचा सामना करण्यासाठी दिवस-रात्र झटत होते.
४ विचारवंतांच्या हत्येनंतर काही हिंदुत्वनिष्ठांना अटक झाल्याच्या त्या आणीबाणीच्या प्रसंगी अधिवक्ता पुनाळेकर यांच्या वडिलांचे निधन झाले. एकुलता एक मुलगा या नात्याने वडिलांचे अंत्यसंस्कार, कुटुंबाला आधार देणे, या भूमिकांमध्ये अधिवक्ता पुनाळेकर होते. दुसरीकडे अटक झेलणार्या हिंदुत्वनिष्ठांच्या समर्थनार्थ न्यायालयीन लढ्याचे नेतृत्वही अधिवक्ता पुनाळेकर यांच्याकडेच होते. अशा स्थितीतही त्यांनी धर्मकर्तव्यालाच प्राधान्य दिले. अधिवक्ता पुनाळेकर यांच्या वडिलांच्या अस्थी विसर्जनाच्याच दिवशी काही हिंदुत्वनिष्ठांना न्यायालयात उभे केले जाणार होते. ‘त्या दिवशी अधिवक्ता पुनाळेकर न्यायालयात पोचू शकणार नाहीत’, अशीच सर्वांची धारणा होती; पण न्यायालय चालू होण्यापूर्वीच अस्थी विसर्जनाचे सर्व विधी करून अधिवक्ता पुनाळेकर हिंदुत्वनिष्ठांची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात उपस्थित झाले.
५. स्वतः झळ सोसून हिंदुत्वासाठी लोकसंग्रह करणे
अधिवक्ता पुनाळेकर यांचा लोकसंग्रह प्रचंड आहे. त्यांच्या हाकेला ‘ओ’ देणारे शेकडो लोक त्यांनी मिळवले आहेत. साथ देणारी माणसे विकत घेता येत नाहीत किंवा ती आपोआपही मिळतही नाहीत, ती सन्मानाने मिळवावी लागतात. त्यासाठी स्वतः तोशीस (झळ) सोसावी लागते. अधिवक्ता पुनाळेकर यांनीही अशाच प्रकारे तोशीस सोसून ही माणसे ‘हिंदुत्वा’साठी जोडली आहेत.’
श्री. नागेश गाडे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ५० वर्षे), फोंडा, गोवा. (२४.७.२०२६)
गुरुग्राम (हरियाणा) येथील साधिका श्रीमती प्रोमिला अग्रवाल (वय ८३ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित
प्रसिद्धी पराङ्मुख आणि इतरांना साहाय्य करणारे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील सनदी लेखापाल (चाटर्ड अकाऊंटंट) श्री. मनीष पारेख (वय ६० वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !
कागल शहरातील वृक्षांची मूक हत्या थांबवा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे कागल नगर परिषद येथे निवेदन
समंजस, प्रेमळ आणि देवाची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील चि. अच्युत स्वयंप्रकाश बंकापूर (वय ४ वर्षे) !
‘आपले खरे कुटुंब हे आपले साधक आहेत’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वचनाची साधिकेला आलेली प्रचीती !