प्रेमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारा वर्धा येथील ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. श्रीरंग नीरज क्षीरसागर (वय १२ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. श्रीरंग नीरज क्षीरसागर हा या पिढीतील एक आहे !

श्री. नीरज विजयराव क्षीरसागर
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सौ. भार्गवी नीरज क्षीरसागर (कु. श्रीरंगची आई), वर्धा

१ अ. ‘कु. श्रीरंग सर्वांशी नम्रपणे बोलतो.

सौ. भार्गवी नीरज क्षीरसागर

१ आ. ‘श्रीरंग आज्ञाधारक आहे’, असे त्याचे शिक्षक मला सांगतात.

१ इ. इतरांचा विचार करणे : एकदा मी बाहेरगावी असतांना एका प्रसंगात त्याच्या मित्रांशी त्याचे मतभेद झाले. त्याने मला तो प्रसंग त्वरित न सांगता मी घरी आल्यावर सांगितला. तेव्हा ‘आई बाहेरगावी आहे. तिला वाईट वाटेल. तिला त्रास नको’, असा त्याचा विचार होता.

१ ई. त्याला सेवा करायला पुष्कळ आवडते.

१ उ. अनुभूती : तो समवेत असतांना माझा नामजप चांगला होतो आणि मला सेवेतून आनंद मिळतो.’

२. श्री. नीरज विजयराव क्षीरसागर (कु. श्रीरंगचे वडील), वर्धा

२ अ. देवता आणि संत यांच्याप्रतीचा भाव

१. ‘श्रीरंग नेहमी कुठेही बाहेर जातांना किंवा कुठलीही कृती करतांना श्रीकृष्णाला सूक्ष्मातून सांगतो.

२. एखादी नवीन वस्तू घरात आणल्यास तो प्रथम ती वस्तू देवापुढे ठेवतो आणि नंतरच वापरण्यास घेतो.

३. तो प्रतिदिन श्रीकृष्णाशी बोलत असल्यामुळे आमच्या घरातील श्रीकृष्णाच्या चित्रात जिवंतपणा जाणवतो.

४. श्रीरंगची प्रकृती ठीक नसतांना किंवा कुठलीही अडचण आली असता तो मला सांगतो, ‘‘प्रथम श्रीकृष्ण आणि पू. पात्रीकरआजोबा (सनातनचे ४२ वे (समष्टी) संत पू. अशोक पात्रीकर, वय ७६ वर्षे) यांना सांग. त्यांना नामजपादी उपाय विचार.’’ त्याचा आध्यात्मिक स्तरावरील उपायांवर अधिक विश्वास आहे.

२ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव : तो मला नेहमी म्हणतो, ‘‘परम पूज्य सर्व बघत आहेत ना ! मी माझ्या मनातील सर्व त्यांनाच सांगतो. ते माझी काळजी घेतात.’’ तो प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) छायाचित्रासमोर उभे राहून त्यांच्याशी सूक्ष्मातून बोलतो.’ 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वर्ष २०२५ मध्ये ‘कु. श्रीरंग नीरज क्षीरसागर हा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२६ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५४ टक्के झाली आहे. ‘त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव’, यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१८.७.२०२६)

३. श्री. नीरज विजयराव क्षीरसागर आणि सौ. भार्गवी नीरज क्षीरसागर (कु. श्रीरंगचे वडील आणि आई), वर्धा

अ. ‘श्रीरंग प्रतिदिन अर्धा घंटा कुलदेवीचा नामजप करतो. तो नियमितपणे रामरक्षास्तोत्र आणि देवाची स्तोत्रे म्हणतो.

आ. तो प्रतिदिन टिळा लावून बाहेर पडतो.’

४. सौ. शिल्पा पाध्ये (कु. श्रीरंगची आजी (आईची आई)), वर्धा

४ अ. ‘श्रीरंग निरागस आहे.

४ आ. राष्ट्रपुरुषांविषयी आदरभाव असणे : श्रीरंगच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी पुष्कळ आदरभाव आहे. वर्धा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ आहे. सर्व लोक त्याला ‘शिवाजी चौक’, असे म्हणतात; मात्र श्रीरंगसमोर जे ‘शिवाजी चौक’, असे म्हणतात, त्यांना तो ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’, असे म्हणायला लावतो.’

५. सौ. वैशाली महेश परांजपे (कु. श्रीरंगची मावशी), नागपूर

५ अ. ‘श्रीरंग प्रत्येक कृती वेळेत करण्याचा प्रयत्न करतो.

५ आ. प्रेमळ : श्रीरंगची प्रकृती ठीक नसतांनाही मी त्याला कधी माझी पाठ किंवा कंबर चेपून देण्यास सांगितले, तर तो न थकता ती चेपून देतो. जोपर्यंत मी त्याला ‘थांब’ म्हणत नाही, तोपर्यंत तो ती कृती करत रहातो.

५ इ. तो मनमिळाऊ आहे. लहान मुले त्याच्याकडे सहज आकृष्ट होतात. तो त्यांची चांगली काळजी घेतो.

५ ई. त्याची स्वीकारण्याची वृत्ती चांगली आहे.’

६. स्वभावदोष 

‘स्वतःच्या मनाप्रमाणे वागणे, आळशीपणा आणि भित्रेपणा’ – श्री. नीरज विजयराव क्षीरसागर आणि सौ. भार्गवी नीरज क्षीरसागर (कु. श्रीरंगचे वडील आणि आई), वर्धा

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक