
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ईश्वरप्राप्तीची इच्छा स्वेच्छेमध्ये येते का ?
श्री. राम होनप :
१. ईश्वरप्राप्तीचे ध्येय निवडण्याची कारणे आणि त्यांचा ‘स्वेच्छा अन् ईश्वरेच्छा’ यांच्याशी असलेला संबंध !
१ अ. दुःखापासून निवृत्ती मिळवणे : ‘व्यक्तीला संसारात विविध विषयांद्वारे पुष्कळ दुःख झालेले असते. त्यापासून तिला निवृत्ती हवी असते. त्यामुळे ती ‘साधना आणि ईश्वरप्राप्ती’ या विषयाकडे वळते. तेव्हा त्या व्यक्तीचा केंद्रबिंदू ‘दुःखापासून निवृत्ती मिळवणे’ हा असतो. त्या वेळी तिच्यात ईश्वराविषयीची ओढ, प्रेम किंवा भाव नसतो. तिने ‘सांसारिक विषय आणि ईश्वरप्राप्ती’ यांपैकी दुःख निवृत्तीसाठी ईश्वरप्राप्तीचा मार्ग निवडलेला असतो. व्यक्तीच्या मनात प्रतिकूल परिस्थितीमुळे ईश्वरप्राप्तीची इच्छा निर्माण झालेली असते. अशा व्यक्तीसाठी ईश्वरप्राप्तीची इच्छा ही स्वेच्छा मानली आहे.
१ आ. पूर्वसुकृतामुळे झालेली भगवंताची कृपा : एखाद्या साधकाच्या जीवनात सुख, दुःख आणि परिस्थिती कशीही असली, तरीही त्याच्या मनात भगवंताविषयी मुळातच ओढ, प्रेम आणि भाव असतो. त्यामुळे त्या साधकाच्या मनात ‘ईश्वरप्राप्ती हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे’, असा प्रबळ विचार असतो. अशा साधकाने मागील जन्मांत काही पुण्यकर्मे आणि साधना केलेली असते. त्यामुळे त्याच्यावर सतत भगवंताची कृपा असते. परिणामी साधकाच्या चालू जन्मात त्याच्यावर मायेचा प्रभाव पडत नाही, तसेच त्याच्यात ईश्वरप्राप्तीची तळमळ निर्माण झालेली असते. अशा साधकातील ईश्वरप्राप्तीची इच्छा ही ‘ईश्वरेच्छा’ मानली आहे; कारण साधकात ईश्वरप्राप्तीची इच्छा बाह्य परिस्थितीमुळे नाही, तर भगवंताच्या कृपेमुळे निर्माण झालेली आहे. ‘असा साधक सुख आणि दुःख यांच्या बंधनात न अडकता त्याला चिरंतन आनंद मिळावा’, अशी ईश्वराची इच्छा असते. त्यामुळे ईश्वर अशा साधकाच्या मनात ईश्वरप्राप्तीची तीव्र इच्छा निर्माण करून त्याची आध्यात्मिक प्रगती करून घेण्याचे कार्य करतो.
२. इच्छांचे प्रकार

२ अ. सात्त्विक इच्छा : ‘देवळात जाणे, तीर्थयात्रा करणे, ग्रंथांचा अभ्यास करणे, सत्संगाला जाणे, सेवा करणे आणि ईश्वरप्राप्तीसाठी साधना करणे’, या सर्व सात्त्विक इच्छा आहेत.
२ आ. राजसिक इच्छा : ‘आवडीचे खाणे-पिणे, फिरणे, मनोरंजनात रमणे आणि संभोग करणे’, या सर्व राजसिक इच्छा आहेत.
२ इ. तामसिक इच्छा : दुसर्याला त्रास देणे, दुसर्याचे वाईट चिंतणे, हिंसा करणे इत्यादी तामसिक इच्छा आहेत.
२ इ १. सात्त्विक इच्छेचे महत्त्व : साधकातील सात्त्विक इच्छांमुळे त्याच्यातील सत्त्वगुण वाढून रज-तम न्यून होऊ लागतात. त्यामुळे अशा साधकाचा ईश्वरप्राप्तीच्या दिशेने जाण्याचा मार्ग सुलभ होतो.
३. साधकाची आध्यात्मिक प्रगती झाल्यावर तो त्रिगुणांच्या पलीकडे जातो. त्यानंतर त्याची वाटचाल निर्गुण तत्त्वाकडे होऊ लागते.
४. ईश्वरप्राप्ती झाल्यावर येणारी अनुभूती
साधकाला ईश्वरप्राप्ती झाल्यावर चिरंतन आनंदाची प्राप्ती होते. तेव्हा त्याला ‘एक ईश्वर सोडून अन्य सर्वकाही, म्हणजे विविध विषय, विचार, पृथ्वी, सत्त्व, रज आणि तम, तसेच कुटुंब, घर, समाज, परिस्थिती आणि जन्म-मृत्यू’ ही माया, म्हणजे भ्रम आहे’, याचे ज्ञान होते. त्यामुळे असे संत कशातही अडकत नाहीत.
५. काही जणांच्या बाबतीत ईश्वरप्राप्तीची इच्छा ही स्वेच्छेमुळे, तर काहींमध्ये ईश्वरेच्छेमुळे निर्माण झालेली असते. दोन्ही स्थितींमध्ये साधकाने ‘साधना करून ईश्वरप्राप्ती साध्य करणे’, हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १२.५.२०२६, वेळ : सकाळी ११.३०, कालावधी : ३० सेकंद)
ही आहे कृतघ्नपणाची परिसीमाच !
देवाच्या प्राप्तीसाठी एका क्षणात मायेचा त्याग करणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !
कै. (श्रीमती) उषा बोकाडे यांच्या रुग्णाईत स्थितीत आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनुभवलेली प्रीती !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यातील चैतन्याची साधिकेला येत असलेली प्रचीती !