‘एकदा मी मार्गिकेत चालत होते. तेव्हा दुसर्या मार्गाने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ जात होत्या. त्यांना पाहिल्यावर मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याभोवती मला पुष्कळ मोठे चैतन्याचे वलय दिसले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ चालत असतांना त्यांच्या प्रत्येक पावलातून पांढरा प्रकाश प्रक्षेपित होतो. ‘ज्या जागेवर त्यांचे पाऊल पडते, ती जागा पवित्र होत जाते. तिथे चैतन्य निर्माण होते’, असे मला जाणवते.

३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या भोवती चैतन्याचे वलय असले, तरी ‘साधक आणि गुरुकार्य’ यांसाठी त्यांचे मारक तत्त्व अधिक कार्यरत असते. (साधकांच्या अडचणी सोडवणे, त्यांची प्रगती, कार्यातील अडचणी सोडवणे, यांसाठी) त्यांच्या भोवती गुरुकृपेचे संरक्षककवच असल्याने वाईट शक्ती त्यांना फारशा त्रास देऊ शकत नाहीत. त्यामुळे ‘साधक आणि गुरुकार्य’ यांच्यातील अडचणी लगेच दूर झालेल्या असतात’, असे मला जाणवते.
४. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे वास्तव्य रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आहे; मात्र त्यांच्या अस्तित्वाचा लाभ सहस्रो कि.मी. अंतरावर असलेल्या साधकांना होत आहे’, असे मला जाणवते.
५. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यातील मारक तत्त्व आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील तारक तत्त्व, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची ही दोन रूपे आहेत’, असे मला जाणवते.
६. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या सहस्रारचक्रावर दैवी लाल कुंकू असल्यासारखे जाणवते आणि ते चमकते.
७. पूर्वी मला ‘त्यांना स्थुलातून भेटावे, त्यांना पहावे’, असे वाटायचे; मात्र ‘आता त्यांना स्थुलातून भेटावे’, असे मला वाटत नाही; कारण ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ माझ्या मनातील विचार जाणतात’, असे मला जाणवते.’
– सौ. जान्हवी अभिजीत विभूते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.६.२०२६)
देवाच्या प्राप्तीसाठी एका क्षणात मायेचा त्याग करणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !
कै. (श्रीमती) उषा बोकाडे यांच्या रुग्णाईत स्थितीत आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनुभवलेली प्रीती !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मंगळुरू सेवाकेंद्रातील साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !
ईश्वरप्राप्तीची इच्छा ही ‘स्वेच्छा कि ईश्वरेच्छा’, यासंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील श्री भवानीमातेच्या मूर्तीचे दर्शन घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !