
नागपूर, १२ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील महिला स्वयंसाहाय्यता गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘उमेद मॉल’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यात राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ उभारण्याचे लक्ष्य असून त्यासाठी सरकारने २०० कोटी रुपयांचे प्रावधान केले आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी १२ डिसेंबर या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरात दिली.
विधानसभा सदस्य राणाजगजितसिंह पाटील यांनी हा प्रश्न विचारला होता. मंत्री गोरे म्हणाले की, राज्यात ६ कोटी ५३ लाख १९२ बचत गट कार्यरत असून त्यांना आतापर्यंत ८७२ कोटी रुपयांचा ‘फिरता निधी’ वितरित केला आहे, तसेच ३ कोटी ७० लाख ३५० गटांना २०० कोटी रुपयांचा ‘समुदाय निधी’ देण्यात आला आहे. बँकांकडूनही मोठ्या प्रमाणात अर्थसाहाय्य मिळत असल्याने महिला उपजीविकेसाठी लघुउद्योजकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
ते पुढे म्हणाले की,

ग्रामीण भागातील महिला बचत गटाने बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी म्हणून ‘महालक्ष्मी सरस’, जिल्हा आणि मिनी सरस अशा प्रदर्शनांचे आयोजन राज्यभर करण्यात येते; मात्र ही केंद्रे तात्पुरती असल्याने महिलांसाठी १२ महिने उपलब्ध असलेली कायमची बाजारपेठ सिद्ध करण्याचा निर्णय म्हणजे ‘उमेद मॉल’(जिल्हा विक्री केंद्र) आहे. प्रत्येक जिल्ह्यात टप्प्याटप्याने किमान २० सहस्र चौ. फुटांचे मॉल उभारण्याचा विचार आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !