सत्कर्म यशस्वी होण्यासाठी अहंकार आणि आसक्ती नकाे !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

कमलपत्र २४ घंटे पाण्यात असते; पण कधी कुजत नाही. त्याच्यावर पाण्याच्या थेंब टाकला, तर मोती ठेवल्यासारखे वाटते. पाणी चिकटत नाही; म्हणून पाण्याचा मोती होतो. सत्कर्माचा मोती व्हावयाचा असेल, तर ते अहंकार आणि आसक्ती यांना चिकटता कामा नये.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ‘ही अनंत संपदा’ या ग्रंथातून)