
१. मनुष्याला खर्या सुख-दुःखाचे ज्ञान नसते. तो ‘आपल्या मनाप्रमाणे होणे म्हणजे सुख’ आणि ‘मनाविरुद्ध होणे म्हणजे दुःख’, असे समजतो.
२. जेव्हा मनुष्य खरोखर दुःखी होतो (त्याच्यात विरक्ती निर्माण होते), तेव्हा त्याला कोणतेही सुख भोगण्याची इच्छा होत नाही. त्याची भोगवासना नष्ट होते.
३. जेव्हा मनुष्याला एखाद्या दुःखामुळे विरक्ती येते, तेव्हा ते दुःखच त्याची ईश्वराशी भेट घालून देते; कारण सुखभोगाची आवड आणि आसक्ती यांमुळेच मनुष्य सुखलोलुप होतो. तो भोगवासनेच्या निवृत्तीमुळेच भगवंताकडे वळतो आणि संसारापासून विन्मुख होतो.
४. जेव्हा एखाद्या दुष्कर्मामुळे होणार्या दुःखाचे प्रमाण त्या दुष्कर्मातून मिळणार्या सुखोपभोगापेक्षा वाढते, तेव्हा त्या मनुष्याला ते दुष्कर्म करण्याची बुद्धी होत नाही.
– ब्रह्मलीन श्रद्धेय स्वामी श्रीशरणानंदजी महाराज यांच्या प्रवचनातून संकलित (साभार : मासिक ‘कल्याण’, फेब्रुवारी २०२२)
साधना संवाद (पॉडकास्ट)
साधकांनो, भविष्याची काळजी न करता स्वतःची साधना वाढवा !
नामाची गोडी लागण्यासाठी प्रपंचाची आसक्ती न्यून करावी !
सत्कर्म यशस्वी होण्यासाठी अहंकार आणि आसक्ती नकाे !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची अमृत वचने
ऐसी लागी लगन । मीरा हो गई मगन ।।