नामाची गोडी लागण्यासाठी प्रपंचाची आसक्ती न्यून करावी !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर पोटामध्ये भूक असूनसुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाची चव लागत नाही. त्याचप्रमाणे आतमध्ये भगवंताचे प्रेम असूनसुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही. तोंड बरे व्हायला जसे प्रथम औषध घ्यावे, त्याचप्रमाणे नामाची गोडी यायला आपण प्रपंचाची आसक्ती न्यून करावी.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज