
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लिखाण
‘बहुसंख्य आई-वडील मातृ-पितृसुख अनुभवण्यासाठी मुलाला जन्म देतात आणि त्याची पूर्ती झाली की, मुलाला कंटाळतात अन् त्याचा विवाह करून मोकळे होतात !’ (३०.४.२०१२)
२. वरील विषयाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. आई-वडिलांचे त्यांच्या मुलाशी (आणि मुलीशी) असलेले नाते साधारण मागील ३ जन्मांपासूनचे असणे : ‘आई-वडील मुलाला जन्म देतात. या जन्मात आई-वडिलांना मुलापासून मातृ-पितृसुख पुष्कळ मिळते आणि मुलालाही असे आई-वडील हवेहवेसे वाटतात. तेव्हा त्यांच्यात देवाण-घेवाण हिशोब निर्माण होतो. त्यामुळे पुढील जन्मी त्या आई-वडिलांच्या पोटी पूर्वजन्मीचे मूलच जन्म घेते. तेव्हा आई-वडिलांना त्या मुलापासून मागील जन्मात मिळालेल्या मातृ-पितृसुखापेक्षा या जन्मात मातृ-पितृसुख तुलनेत न्यून मिळते. या जन्मात त्या मुलाचीही आपल्या आई-वडिलांविषयी असलेली ओढ मागील जन्माच्या तुलनेत न्यून होते; परंतु आई-वडील आणि ते मूल यांच्यातील नाते देवाण-घेवाण हिशोबामुळे आणखी घट्ट झालेले असते. तिसर्या जन्मात त्या आई-वडिलांना मातृ-पितृसुख मिळण्याचे प्रमाण आणखी न्यून होऊन मुलाद्वारे होणार्या दुःखाचे प्रमाण वाढलेले असते. मुलालाही त्या आई-वडिलांविषयी पूर्वीच्या जन्मांत वाटणारी आत्मीयता या जन्मात न्यून झालेली असते.
२ आ. आई-वडिलांना चौथ्या जन्मात मुलाच्या वयानुरूप मिळणारे सुख-दुःख : जेव्हा मागच्या तीन जन्मांत असलेले मूल आई-वडिलांच्या पोटी चौथ्यांदा जन्म घेते, तेव्हा मुलाच्या वयोमानानुसार आई-वडिलांना मिळणारे सुख आणि दुःख पुढे दिले आहे.

२ आ १. वय १ ते १२ वर्षे : या कालावधीत आई-वडिलांना मातृ-पितृसुख मिळते; कारण या वयात मूल आई-वडील सांगत असलेले बहुतेक ऐकते आणि त्याप्रमाणे कृती करते. त्यामुळे आई-वडील आणि मूल यांचे संबंध चांगले असतात.
२ आ २. वय १३ ते १८ वर्षे : या कालावधीत मुलाच्या अंतर्मनात सुप्त असलेले स्वभावदोष, अहं आणि आई-वडिलांशी असलेले पूर्वीचे देवाण-घेवाण हिशोब प्रगट होतात. त्यानुसार ते मूल आई-वडिलांशी वर्तन करू लागते. तेव्हा ‘आई-वडिलांचे मुलावर असलेले नियंत्रण न्यून होऊ लागणे, त्यांचा अपेक्षाभंग होऊ लागणे, तसेच मुलाने मनाप्रमाणे वागणे, इतरांचे न ऐकणे’, यांविषयी त्यांना दुःख होऊन ते पुढे वाढू लागते.

२ आ ३. वय १८ वर्षांच्या पुढे : सर्वसाधारणपणे मुलाचे त्याच्या वयाच्या १८ व्या वर्षानंतर स्वतःचे जीवन चालू होते. तेव्हा त्याच्यावरील त्याच्या आई-वडिलांचा प्रभाव न्यून झालेला असतो. मागील ३ जन्मांतील संबंधांमुळे चौथ्या जन्मात आई-वडिलांची मुलाप्रतीची आसक्ती पुष्कळ वाढलेली असते. त्यामुळे आई-वडिलांना मूल त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागत नसल्याचे छोट्या छोट्या प्रसंगांत लक्षात येऊन पुष्कळ दुःख होते. परिणामी आई-वडिलांचे मातृ-पितृसुख न्यून होऊ लागते. मुलामुळे होणार्या अती दुःखामुळे आई-वडिलांना त्या मुलाचा कंटाळा येऊ लागतो.
२ इ. कलियुगात मातृ-पितृसुख मिळणे दुर्लभ असणे : कलियुगात बहुतेक जण साधना आणि धर्माचरण यांपासून दूर गेलेले असल्याने प्रत्येकात स्वभावदोष अन् अहं यांचे प्रमाण पुष्कळ वाढलेले आहे. त्यामुळे आई-वडील आणि मूल यांच्यात तीव्र देवाण-घेवाण हिशोब असतात. परिणामी बहुतेक आई-वडिलांना मातृ-पितृसुख अल्प मिळते आणि दुःख होण्याचे प्रमाण अधिक असते. सध्याच्या काळात आई-वडिलांना आज्ञाधारक आणि काळजी घेणारा मुलगा मिळणे दुर्लभ आहे. सात्त्विक मुलामुळे आई-वडिलांना त्यांच्या मृत्यूपर्यंत मातृ-पितृसुख मिळते.
२ ई. साधना करणार्या आई-वडिलांचे जीवन आनंदी असण्याचे कारण : साधक असलेल्या आई-वडिलांचे ध्येय केवळ ‘साधना करून ईश्वरप्राप्ती करणे’, हे असते. त्यामुळे त्यांना मुलाकडून सुख मिळाल्यास ते गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात आणि दुःख मिळाल्यास ‘प्रारब्धभोग’ म्हणून स्वीकारतात. असे साधक आई-वडील मुलाद्वारे मिळणार्या सुखात हुरळून जात नाहीत किंवा दुःखाने हताश होत नाहीत. त्यांच्या मुलाकडून अपेक्षाही अल्प असतात. अशा साधक आई-वडिलांचे मुलाशी असलेले देवाण-घेवाण हिशोब न्यून होऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती शीघ्र होते. परिणामी साधक आई-वडिलांचे जीवन आनंदी होऊन त्यांच्या जीवनाचे सार्थक होते.
२ उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या लिखाणाचा भावार्थ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वरील लिखाणाचा भावार्थ पुढीलप्रमाणे आहे – ‘बहुतेक आई-वडील जीवनाचे ध्येय ईश्वरप्राप्ती असल्याचे विसरून मातृ-पितृसुखात अडकतात. त्यामुळे ते प्रथम सुखात आणि त्यानंतर दुःखात अनेक जन्म अडकतात; म्हणून आई-वडिलांनी त्यात न अडकता ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करणे’ सर्वाधिक महत्त्वाचे आहे.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : २७.२.२०२६, वेळ : सकाळी १०.३०, कालावधी : १५ सेकंद)
|
आतंकवाद्यांची ‘दहशत’ !
साधकांनो, भविष्याची काळजी न करता स्वतःची साधना वाढवा !
साधिकेची मातृभाषा मराठी नसूनही तिला मराठी भाषेतील सात्त्विकतेची आलेली प्रचीती !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
तरुणांनो, भ्रष्टाचार उघड करा आणि तुमची राष्ट्रभक्ती वाढवा !
विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधातील लढ्याच्या प्रसंगी कोल्हापूर येथील श्री. बाबासाहेब भोपळे यांना शिकायला मिळालेली सूत्रे !