माउंट अबू येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेच्या वतीने परिषद

पणजी, ११ जुलै (वार्ता.) – समाजहितासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी अध्यात्म महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेच्या वतीने राजकारणात आध्यात्मिक मूल्यांचा समावेश करून शांततामय समाज घडवण्याच्या उद्देशाने माउंट अबू येथील ज्ञान सरोवरमध्ये आयोजित ‘स्पिरिच्युॲलिटी इन पॉलिटिक्स फॉर अ पीसफुल सोसायटी’ या महत्त्वपूर्व परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होत. या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या परिषदेला भारत आणि नेपाळ येथील विविध राजकीय नेते अन् विचारवंत उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले, ‘‘अध्यात्म नेत्यांना आंतरिक स्थिरता, विचारांमध्ये स्पष्टता आणि करुणा प्रदान करते. त्यामुळे समाजाच्या व्यापक हितासाठी अधिक संतुलित आणि योग्य निर्णय घेणे शक्य होते. ही परिषद राजकीय क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवण्यास आणि मूल्याधिष्ठित नेतृत्व घडवण्यास प्रेरणादायी ठरेल.’’ या वेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘शांतता, राजयोग ध्यान, मूल्याधिष्ठित जीवनशैली आणि सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी संस्थेचे योगदान मोलाचे आहे.’’
वैभववाडी येथे ६ गोवंशियांची अवैध वाहतूक रोखली
भात लावणीच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त
गोव्यात चर्च संस्थेच्या २ फादरांविरुद्ध भूमी घोटाळ्यात आरोपपत्र प्रविष्ट
कोकणातील हापूस आंब्याच्या संकटावर महाराष्ट्र शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी !
उष्णतेच्या लाटेमुळे वीज देयकांत वाढ ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
राज्यात बियाणांचे ३०० नमुने निकृष्ट