
सामाजिक संदर्भात व्यक्तीच्या चारित्र्याकडे पाहिलेच पाहिजे. ज्या व्यक्तीचे आचरण अगदी उघडपणे दुवर्तनात मोडणारे असेल, ती व्यक्ती समाजापुढे विशेषत: तरुणांपुढे तरी गौरवासाठी येताच कामा नये. वाङ्मयाला भूषण असणार्या त्याच्या पुस्तकाचे कौतुक करा. पुस्तकाला पाहिजे, तर हार घाला; परंतु माणसाला पुढे आणून त्याला समाजाच्या गौरवाचा विषय करू नका. पंडित राजेश्वरशास्त्री द्रविड यांच्यासारखी सच्चरित्र आणि अत्यंत विद्वत्ता संपन्न, सर्वशास्त्रपारंगत अशी व्यक्ती दिवंगत झाली, ती वार्ता चांगल्या प्रतिष्ठित आणि संस्कृतप्रेमी वृत्तपत्रांमध्येही ४-५ ओळीत कुठेतरी आली. त्यांच्या चारित्र्याचे आणि विद्वत्तेचे गुणगान करणारे लेख कुठेही आले नाहीत. उलट एखादा अभिनेता, अभिनेत्री मेले, तर त्यांच्या वर्णनाने वृत्तपत्राची पानेच्या पाने भरून लिहिलेली असतात.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?
संघटित होऊन कार्य करण्याचे रहस्य !
सनातनची सर्वांगस्पर्शी आणि चैतन्यमय ग्रंथसंपदा !
चारित्र्यवान माणसे घडवण्याची आणि स्त्रियांची स्थिती सुधारण्याची आवश्यकता !