अवे, खोतीगाव येथील श्री मल्लिकार्जुन मंदिराचे सुशोभीकरण

काणकोण, १० जुलै (वार्ता.) – अवे, खोतीगाव, काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या महाजनांनी मंदिराचा पायाभूत विकास प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक यांची भेट घेतली आणि त्यांना या अनुषंगाने एक निवेदन सादर केले.
गोवा पर्यटन विकास महामंडळाने नुकतीच अवे, खोतीगाव, काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन मंदिराचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण प्रकल्पाची ५ कोटी ४२ लक्ष रुपये किमतीची निविदा रहित केली आहे. हे कंत्राट एका अहिंदु व्यक्तीला दिल्याने याला ‘गोमंतक मंदिर महासंघ’, तसेच अनेक भाविकांनी सामाजिक माध्यमाद्वारे रोष व्यक्त केल्यानंतर महामंडळाने ही निविदा रहित केली होती. यानंतर मंदिर समितीने एक पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते की, या पायाभूत विकास प्रकल्पाच्या अंतर्गत ३०० वर्षे जुन्या मुख्य मंदिराच्या बांधकामाला हात लावला जाणार नव्हता, तसेच या प्रकल्पाच्या अंतर्गत मंदिराच्या जवळ असलेला ४० वर्षे जुना सभामंडप मोडून त्या ठिकाणी नवीन सभामंडप उभारणे, २ कमानींची उभारणी करणे, ३०० भाविकांसाठी स्वयंपाकघराची सोय असलेल्या अग्रशाळेचे बांधकाम करणे, कार्यालयाचे बांधकाम करणे, वाहनतळ सुविधा उभारणे, स्वच्छतागृह उभारणे, जलनिस्सारण व्यवस्था उभारणे, चालण्याचा मार्ग उभारणे आणि रोषणाई करणे या कामांचा सहभाग होता. महाजनांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक यांनी आवश्यक सहकार्य करणार असल्याचे आश्वासन महाजनांना दिले आहे. महाजनांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक यांनी या प्रकरणी प्रकल्पाचे नियोजन करण्यापासून त्याची कार्यवाही करण्यापर्यंत काम पुढे नेणारे स्थानिक आमदार तथा मंत्री रमेश तवडकर यांचे कौतुक केले.
जेवणात अळ्या सापडल्यामुळे गोवा विद्यापिठाचा खानावळ (मेस) कंत्राटदार निलंबित
बँक फसवणूक प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून गोवा आणि इतर राज्यांमधील मालमत्ता जप्त
नेमळे येथे चारचाकीच्या अपघातानंतर सिंधुदुर्गात गोमांससदृश मांसाची वाहतूक होत असल्याचे उघड
ठाणे येथे घराचा भाग कोसळला; १२ वर्षीय मुलाचा मृत्यू, दोघे घायाळ
सहस्रो एकर भूमी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकार्यांकडून ३ सदस्यीय समितीची स्थापना !
Belur Chennakeshava Temple Theft : कर्नाटकातील ऐतिहासिक चन्नकेशव स्वामी मंदिराच्या दानपेटीतील १ लाख ९८ सहस्र रुपये चोरणार्याला अटक