
ठाणे, १० जुलै (वार्ता.) – येथील ब्रह्मांड भागांतील आझादनगर परिसरातील मद्रास चाळीत १० जुलैला दुपारी ३.३५ वाजता घराच्या गॅलरीचा काही भाग शेजारच्या घरावर कोसळून १२ वर्षीय जयकुमार जयस्वाल याचा मृत्यू झाला आहे, तर उर्मिला जयस्वाल (वय ३५ वर्षे) आणि विनित जयस्वाल (वय ९ वर्षे) हे घायाळ झाले आहेत. घायाळांवर टायटन रुग्णालयात उपचार चालू आहेत. दुर्घटनेनंतर अग्नीशमनदल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस यांनी बचावकार्य राबवले. सुरक्षेच्या कारणास्तव चाळीतील ३ घरे रिकामी करून परिसराला ‘धोकापट्टी’ लावण्यात आली असून पुढील कार्यवाही चालू आहे.
जेवणात अळ्या सापडल्यामुळे गोवा विद्यापिठाचा खानावळ (मेस) कंत्राटदार निलंबित
बँक फसवणूक प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून गोवा आणि इतर राज्यांमधील मालमत्ता जप्त
नेमळे येथे चारचाकीच्या अपघातानंतर सिंधुदुर्गात गोमांससदृश मांसाची वाहतूक होत असल्याचे उघड
महाजनांनी प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची घेतली भेट
कुडाळच्या नगरसेविका सौ. संध्या तेरसे यांचे आजपासून उपोषण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती