सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी उपस्थित साधकांना काही दैवी बालिकांचा परिचय करून देण्यात आला. त्यांतील कु. श्रिया राजंदेकर (आताची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय १५ वर्षे) आणि कु. अपाला औंधकर (आताची आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १९ वर्षे) यांचे प्रगल्भ विचार, त्यांना आलेल्या अनुभूती आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दैवी बालकांविषयी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. कु. श्रिया राजंदेकर (आताची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय १५ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती !
१ अ. प्रयोगापूर्वी हात दुखणे आणि प्रार्थना करून श्रीकृष्णाचे चित्र हातात धरल्यावर हात दुखणे थांबणे

कु. श्रिया राजंदेकर : ‘प.पू. डॉक्टर, आजच्या सत्संगात उपस्थित साधकांकडून ‘श्रीकृष्णाचे चित्र पाहून काय जाणवते ?’, हा प्रयोग करून घ्यायचा होता. त्या प्रयोगासाठी श्रीकृष्णाचे चित्र हातात धरून ते सर्वांना दाखवण्याची सेवा माझ्याकडे होती. त्यापूर्वी माझे हात थोडे दुखत होते. जेव्हा मी श्रीकृष्णाचे चित्र हातात धरले, तेव्हा माझ्याकडून आपोआप प्रार्थना झाली, ‘श्रीकृष्णा, माझ्यावर जे त्रासदायक शक्तीचे आवरण आले आहे, ते नष्ट होऊ दे आणि तूच माझ्याकडून ही सेवा तुला अपेक्षित अशी करून घे.’ नंतर मला हलके वाटायला लागले. माझे हात दुखणे थांबले.
१ आ. ‘दत्तमाला मंत्रा’चे पठण करत असतांना सूक्ष्मातून श्री दत्तगुरूंचे दर्शन होणे
कु. श्रिया राजंदेकर : मी आता प्रतिदिन सकाळी ‘दत्तमाला मंत्रा’च्या पठणाला येते. आज मंत्रपठण करतांना मला सूक्ष्मातून श्री दत्तगुरूंचे दर्शन झाले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : इतक्या छोट्या वयात तुला दत्तगुरूंचे दर्शन झाले. मोठ्यांनी आयुष्यभर साधना केली, तरी त्यांना असे दर्शन होत नाही.
कु. श्रिया राजंदेकर : श्री दत्तगुरु माझ्या समोर आले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. तेव्हा मी त्यांना नमस्कार केला. जेव्हा दत्तमाला मंत्रपठण झाले, तेव्हा मला त्यांचा स्पर्शही जाणवत होता अन् ‘ते माझ्या समवेत आहेत’, असे मला जाणवले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : खूप छान !
२. कु. अपाला औंधकर (आताची आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १९ वर्षे)
२ अ. प्रगल्भ विचार

२ अ १. गुरुदेवांचे निर्गुण कार्य चालू असल्याने प्रसारातील साधकांचीही वेगाने प्रगती होत आहे !
कु. अपाला औंधकर : गुरुदेव, आजचा सत्संग वैशिष्ट्यपूर्ण आहे. आज येथे आलेले सगळे साधक प्रसारात सेवा करणारे आहेत. आरंभी मला वाटायचे, ‘आपण आश्रमात आहोत. गुरुदेवांच्या कृपाछत्राखाली आहोत’; पण आता मला जाणीव झाली, ‘जे साधक आश्रमाबाहेर आहेत, प्रसारात सेवा करत आहेत, त्यांचीही आध्यात्मिक प्रगती तुम्ही किती वेगाने करून घेत आहात ! तुमचे निर्गुण कार्य चालू आहे.’
२ अ २. आपण आपल्याला ‘ईश्वरप्राप्ती’ होईल, अशा छोट्या छोट्या ‘प्रतिज्ञा’, म्हणजे ध्येय घ्यायला हवेत !
कु. अपाला औंधकर : महाभारतात भीष्माचार्य आणि अर्जुन यांच्यासारखे रथी-महारथी होते. त्यांनी वेगवेगळ्या ‘प्रतिज्ञा’ घेतल्या होत्या, उदा. भीष्माचार्यांनी आजीवन ब्रह्मचारी रहाण्याची प्रतिज्ञा घेतली होती. ही इतकी मोठी प्रतिज्ञा होती की, ‘महाभारत’ घडले ! त्यातून मला शिकायला मिळाले की, आपणही आपल्याला ‘ईश्वरप्राप्ती’ होईल, अशा छोट्या छोट्या ‘प्रतिज्ञा’, म्हणजे ध्येये घ्यायला हवीत.
२ आ. आलेली अनुभूती
२ आ १. सत्संगात एका साधकाची झालेली भावजागृती गुरुदेवांनी करुणामय दृष्टीने पाहिल्यावर महाविष्णूचे स्मरण होणे
कु. अपाला औंधकर : गुरुदेव, आता जे काका बोलत होते, त्यांची पुष्कळ भावजागृती झाली. त्या वेळी तुम्ही त्यांच्याकडे पहात होता. तेव्हा तुमची ती करुणामय दृष्टी अशी होती की, ‘तिच्याकडे पहातच रहावे’, असे मला वाटत होते. त्या वेळी मला जाणवले, ‘श्री महाविष्णु वैकुंठात आहे आणि तो योगनिद्रेत आहे; पण पृथ्वीतलावर तुमच्या रूपातील विष्णु सर्वकाही ऐकत आहे.’
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली सूत्रे !
३ अ. दैवी बालकांचे विचार प्रगल्भ असून ते त्यांना उत्फूर्तपणे सुचतात !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (सत्संगातील साधकांना उद्देशून) : आपल्याला अशा विचारांची कल्पना तरी करता येईल का ? ‘आपण यांना ‘दैवी बालके’ म्हणतो, ते किती योग्य आहे !’, हे आता तुम्ही अनुभवले ना ? यांना कुणी काही शिकवलेले नाही. त्यांना स्वतःलाच उत्फूर्तपणे सगळे सुचते आणि आपण मोठे हे शिकतो, ते शिकतो, नोकरी करतो. त्याला काय किंमत आहे ?
३ आ. कु. अपाला हिला साधनेत साहाय्य करणारी आई मिळाल्याने ती भाग्यवान आहे !
कु. अपाला औंधकर : काल माझे आणि आईचे बोलणे झाले. तेव्हा आई म्हणाली, ‘‘तू आधीपासून गुरुदेवांचीच होतीस. १४ वर्षे त्यांनी मला तुला सांभाळायला दिले. आता तू साधनेसाठी आश्रमात आली आहेस, म्हणजे तू पुन्हा गुरुदेवांकडेच आली आहेस. त्यामुळे त्यांना पुष्कळ आनंद झाला असेल.’’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तू किती भाग्यवान आहेस ! तुला चांगली आई मिळाली, नाहीतर बर्याच दैवी बालकांचे आई-वडील त्यांना साधनेत विरोध करतात.’
हिंदूंची मंदिरे सरकारी कह्यात का ?
योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी त्यांच्या भक्तांना नागदेवतेचे दर्शन घडवल्याच्या संदर्भातील अनुभूती !
देवद (पनवेल) येथील ध्यानमंदिरात ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत असतांना साधकाला सूक्ष्मातून झालेले श्रीविष्णुदर्शन !
साधकांना सूचना : साधकांनो, पुढील पिढ्या घडवण्यासाठी तुमचे साधनेतील अनुभव नियमित लिहून द्या !
खरा न्याय केवळ सूक्ष्मातील कळणारे संतच करू शकतात !