धनबाद (झारखंड) येथे ‘भारत कोकिंग कोल लिमिटेड’ येथील कर्मचार्यांसाठी ‘तणावमुक्ती’ विषयावरील व्याख्यान

धनबाद (झारखंड) – कामाच्या ठिकाणी सुरक्षितता राखण्याविषयी ‘भारत कोकिंग कोल लिमिटेड’च्या (‘बी.सी.सी.एल्.’च्या) कर्मचार्यांसाठी ३ दिवसांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि ईशान्य भारताचे राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे यांना संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी श्री. गवारे यांनी तणाव आणि तणावाची कारणे विषद करून ‘तणावमुक्तीसाठी शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक प्रयत्नांची आवश्यकता आहे’, असे उपस्थितांना सांगितले. या कार्यशाळेत आस्थापनातील अनेक कर्मचारी उपस्थित होते. या वेळी त्यांनी ‘आम्ही असा विषय प्रथमच ऐकत आहोत. याचा आम्हाला केवळ कामाच्या ठिकाणीच नाही, तर आमच्या वैयक्तिक जीवनातही लाभ होईल’, असे उत्स्फूर्तपणे सांगितले.
‘मराठा तितुका मेळवावा’च्या पुढाकाराने वल्लभगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती विराजमान !
देवतांच्या भग्न मूर्तींची विटंबना रोखण्यासाठी ‘हिंदवी सेने’च्या वतीने विसर्जन पेटी उपलब्ध
वृक्ष संवर्धन आणि सार्वजनिक सुरक्षितता यांसाठी प्रशासनाने सक्षम यंत्रणा उभी करावी ! – सुराज्य अभियान
(म्हणे) ‘कुंकू इस्लामी देशांमधून येते, तर मग हिंदू टिळा लावणे बंद करतील का ?’ – Priyank Kharge
ED Freezes TMC Deposits : अंमलबजावणी संचालनालयाने तृणमूल काँग्रेसशी संबंधित ३ बँक खाती गोठवली
‘मुस्लिम पर्सनल लॉ’ देशाच्या कायद्यापेक्षा वरचढ नाही ! – Allahabad High Court