
सिंधुदुर्गनगरी, ८ जुलै (जि.मा.का.) – शासकीय कामकाजातील कर्तव्यात हयगय (कसूर) केल्याचा ठपका ठेवून दोडामार्ग गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत आणि मालवणचे विस्तार अधिकारी (शिक्षण) तथा प्रभारी (तात्पुरता कार्यभार सांभाळणारे) गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आला आहे.
दोडामार्ग तालुक्यातील अतीवृष्टीमुळे झालेल्या हानीची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ६ जुलै २०२६ या दिवशी पहाणी केली, तेव्हा अनुपस्थित रहाणे, २० एप्रिल २०२६ या दिवशी आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत करायच्या कामांच्या आढावा बैठकीत संबंधित ग्रामपंचायतींना सूचना दिल्या होत्या, त्यांचा पाठपुरावा करून आवश्यक ती कार्यवाही न करणे आणि विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीस अनुपस्थित रहाणे, तसेच या अनुपस्थितींकरता जिल्हाधिकार्यांची कोणतीही पूर्वअनुमती न घेणे, असा ठपका ठेवून अजिंक्य सावंत यांच्या निलंबनाची शिफारस शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या प्रधान सचिवांकडे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकार्यांनी निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाने मालवण येथे घेतलेल्या आढावा बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित रहाण्याविषयी मालवणचे विस्तार अधिकारी (शिक्षण) तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय माने यांना दूरध्वनीद्वारे आगाऊ सूचित करण्यात आलेले होते. तसेच त्यांना साहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. असे असूनही ते या बैठकीस अनुपस्थित राहिले, तसेच अनुपस्थितीकरीता त्यांनी जिल्हाधिकार्यांची कोणतीही पूर्वअनुमती घेतलेली नसल्याने माने यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याविषयीची शिफारस जिल्हा प्रशासनाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केलेली आहे.
इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्र वाचनाचे विद्यार्थ्यांना आवाहन : मातृभाषाप्रेमींमध्ये संताप
कांदोळी येथील किनारी नियमन क्षेत्राचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी अभिनेता सलमान खान यांना न्यायालयाची नोटीस
‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या घोषणेची प्रभावी कार्यवाही कधी होणार ?
मुरगाव येथील श्री दामोदर सप्ताहाच्या फेरीमध्ये होणार्या हिंदुविरोधी कृत्यांवर बंदी आणा !
तज्ञांचे मत जाणून घेऊ ! – सौ. अश्विनी भिडे, आयुक्त, मुंबई महापालिका
शहापूरचा प्रस्तावित कल्याण अपर जिल्हाधिकारी कार्यालयात समावेश करा !