
पणजी, ८ जुलै (वार्ता.) – कांदोळी येथील ‘किनारपट्टी नियमन क्षेत्रा’चे (‘सी.आर्.झेड.’चे – ‘कोस्टल रेग्युलेशन झोन’चे) उल्लंघन झाल्याच्या प्रकरणी ‘कळंगुट मतदारसंघ मंच’ यांनी प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करतांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने अभिनेता सलमान खान यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
जनहित याचिकेत कांदोळी येथील संबंधित मालमत्तेवरील बांधकामाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याचिकेनुसार संबंधित भूमी ही ‘सी.आर्.झेड.-३’च्या अंतर्गत येणार्या १०० मीटर ‘विकासवर्जित विभागा’मध्ये (नो डेव्हलपमेंट झोन’मध्ये) असून तेथे बांधकाम करण्यास मनाई आहे. सिकेरी नदीच्या उच्च भरती रेषेपासून सुमारे ५५ मीटर अंतरावर ‘व्हिला’ आणि जलतरण तलाव उभारण्यात आला आहे. यामुळे पर्यावरणीय नियम आणि ‘सी.आर्.झेड.’ यांचे उल्लंघन झाले आहे. ‘क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंट्स प्रा. लि.’ हे आस्थापन विकासक आहेत, तर अभिनेता सलमान खान हे या आस्थापनाचे व्यवस्थापकीय भागीदार आहेत.
इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्र वाचनाचे विद्यार्थ्यांना आवाहन : मातृभाषाप्रेमींमध्ये संताप
शासकीय कर्तव्यात हयगय केल्यावरून २ अधिकार्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव
मुरगाव येथील श्री दामोदर सप्ताहाच्या फेरीमध्ये होणार्या हिंदुविरोधी कृत्यांवर बंदी आणा !
तज्ञांचे मत जाणून घेऊ ! – सौ. अश्विनी भिडे, आयुक्त, मुंबई महापालिका
शहापूरचा प्रस्तावित कल्याण अपर जिल्हाधिकारी कार्यालयात समावेश करा !
दशावतारासह लोककलाकारांचे अनुदान दुप्पट होणार ! – आशिष शेलार