वृक्ष मोठ्या प्रमाणात पडत असल्याचे प्रकरण

मुंबई – मुंबईतील अनेक झाडे ५० ते ६० वर्षे जुनी आहेत. त्यांची मुळे पुष्कळ खोलवर गेली आहेत. यासाठी रस्ते बांधत असतांना कोणती काळजी घ्यावी, याविषयी आमच्या कार्यपद्धती आहेत. त्यातही तज्ञांचे मत जाणून घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. भूमीखालून विविध यंत्रणांच्या वाहिन्या गेल्या आहेत. त्यांची कामे करतांनाही काळजी घेऊ, रस्ते बांधणीच्या कार्यपद्धतीत सुधारणा करू, असे मुंबई महापालिका आयुक्त सौ. अश्विनी भिडे यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले.
रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाते, पेव्हर ब्लॉक बसवले जातात. त्यामुळे अशा ठिकाणी मुळांना पाणी पोचवणे आवश्यक आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण हे वाहनांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर केले जाते. झाडे पडण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तज्ञांचे साहाय्य घेतले जाईल, असे सौ. भिडे यांनी सांगितले.
मोठ्या प्रमाणात वारे वहात असल्याने या वर्षी जेवढी वर्षभरात झाडे पडतात, त्याच्या ५० टक्के झाडे ही केवळ एका दिवसात पडली. मुंबईत पावसाचे पाणी साठण्याची समस्या कायमस्वरूपी सुटावी म्हणून निधी मिळवण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी ‘आयआयटी, मुंबई’च्या साहाय्याने पाणी साचण्याची ३०० ते ३५० ठिकाणे न्यून करण्यासाठी मोठा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.
न्यायालयाची टिपणी !
मुंबईत पावसाळ्यात उद्भवणार्या पणी साठण्याच्या समस्येसाठी केवळ महापालिकेला दोष देणे नागरिकांनी थांबवले पाहिजे. अनधिकृत बांधकामे, तुंबलेली गटारे आणि सार्वजनिक सुविधांचा गैरवापर यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ती आपलीच निर्मिती आहे. आपल्याला मातृभूमीला लुटण्याची आपली सवय आहे. भूमी बळकावण्यात आपण पटाईत आहोत. त्यामुळे रस्त्यांवर पावसाचे पाणी साचलेले पहाणे, हेच मुंबईच्या नशिबात आहे. अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने ७ जुलै या दिवशी केली.
इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्र वाचनाचे विद्यार्थ्यांना आवाहन : मातृभाषाप्रेमींमध्ये संताप
कांदोळी येथील किनारी नियमन क्षेत्राचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी अभिनेता सलमान खान यांना न्यायालयाची नोटीस
शासकीय कर्तव्यात हयगय केल्यावरून २ अधिकार्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव
मुरगाव येथील श्री दामोदर सप्ताहाच्या फेरीमध्ये होणार्या हिंदुविरोधी कृत्यांवर बंदी आणा !
शहापूरचा प्रस्तावित कल्याण अपर जिल्हाधिकारी कार्यालयात समावेश करा !
दशावतारासह लोककलाकारांचे अनुदान दुप्पट होणार ! – आशिष शेलार