विश्व हिंदु परिषदेचे मुरगावच्या उपजिल्हाधिकार्यांना निवेदन

मुरगाव, ८ जुलै (वार्ता.) – मुरगाव येथील श्री दामोदर भजनी सप्ताहाच्या वेळी फेरीमध्ये होणार्या हिंदुविरोधी कृत्यांवर बंदी आणून हिंदूंच्या भावनांचे रक्षण करावे, अशा आशयाचे निवेदन विश्व हिंदु परिषदेच्या मुरगाव शाखेकडून मुरगावच्या उपजिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे. या निवेदनातील सूत्रे खालीलप्रमाणे आहेत.
१. श्रावण या पवित्र महिन्यात फेरीमध्ये मांसाहारी पदार्थ ठेवून त्यांची विक्री केली जाते. यामुळे भाविकांच्या श्रद्धा आणि भावना दुखावतात. एका विशिष्ट जमातीतील लोकांकडून सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचा जाणूनबुजून प्रयत्न केला जातो.
२. या फेरीमध्ये ख्रिस्ती मिशनर्यांकडून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे ग्रंथ असणारे कक्ष उभारले जातात. या कक्षावरून ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला जातो, तसेच त्यांचे काही स्वयंसेवक श्री दामोदराच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना त्यांचे ग्रंथ आणि पत्रके देतात. यामुळे भाविकांमध्ये धार्मिक अस्थिरता निर्माण होत असल्याने अशा प्रकारच्या धर्मांतराच्या प्रयत्नांवर कडक कारवाई करण्यात यावी.
३. काही वेळा कक्ष (स्टॉल) उभारण्यासाठी एखाद्याला दिलेली अनुज्ञप्ती ही दुसर्या अज्ञात व्यक्तीच्या नावाने कोणतीही पडताळणी न करता किंवा मुरगाव नगरपालिका आणि पोलीस यांना न सांगता हस्तांतरित केली जाते. यामुळे सुरक्षाव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. सध्या होत असलेल्या आतंकवादी आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे होणारे अनुज्ञप्तीचे हस्तांतरणे थांबवावे. कक्षावर (स्टॉल) अनुज्ञप्ती घेतलेल्या व्यक्तीचे नाव, अनुज्ञप्ती घेतल्याची प्रत आणि कक्ष उभारण्याचा उद्देश हे प्रदर्शित करण्यात यावे.
४. भिकार्यांच्या मुलांचे गट फेरीमध्ये आलेल्या महिलांना त्रास देतात. गळ्यातील साखळ्या पळवणे किंवा खिसे कापणे यांमध्येही या भिकार्यांचा सहभाग असतो. हे प्रकार होऊ नयेत, यासाठी उपाययोजना करावी.
५. हिंदूंच्या पवित्र धार्मिक उत्सवांमध्ये हिंदूंच्या भावना दुखावून अशांतता निर्माण करण्याचा हेतूपूर्वक प्रयत्न करणे, हे एक पूर्वनियोजित कारस्थान असून मुरगाव तालुक्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी यावर कडक कारवाई करण्यात यावी.
इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्र वाचनाचे विद्यार्थ्यांना आवाहन : मातृभाषाप्रेमींमध्ये संताप
कांदोळी येथील किनारी नियमन क्षेत्राचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी अभिनेता सलमान खान यांना न्यायालयाची नोटीस
शासकीय कर्तव्यात हयगय केल्यावरून २ अधिकार्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव
तज्ञांचे मत जाणून घेऊ ! – सौ. अश्विनी भिडे, आयुक्त, मुंबई महापालिका
शहापूरचा प्रस्तावित कल्याण अपर जिल्हाधिकारी कार्यालयात समावेश करा !
दशावतारासह लोककलाकारांचे अनुदान दुप्पट होणार ! – आशिष शेलार