China Bribery Case : ३० वर्षांत ३ सहस्र कोटी रुपयांची लाच घेणार्‍या चीनच्या माजी अधिकार्‍याला फाशीची शिक्षा

यांग योलिन (मध्यभागी)

बीजिंग (चीन) – चीनमधील नानजिंग आर्थिक विकास क्षेत्राचे माजी वरिष्ठ अधिकारी यांग योलिन यांना तब्बल ३ सहस्र कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने यांग योलिन यांना केवळ लाचखोरीच नव्हे, तर सार्वजनिक निधीचा अपहार, सत्तेचा गैरवापर, आर्थिक गैरव्यवहार आणि इतर आर्थिक गुन्ह्यांमध्येही दोषी ठरवले आहे. तसेच त्यांच्या सर्व वैयक्तिक मालमत्ता जप्त करण्याचे आणि अवैधरित्या मिळवलेली संपूर्ण रक्कम वसूल करण्याचे आदेशही दिले.

यांग योलिन यांनी वर्ष १९९३ ते २०२३ या ३० वर्षांच्या कालावधीत विविध सरकारी पदांवर असतांना उद्योगपती आणि व्यावसायिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे अन् मालमत्ता स्वीकारली. बदल्यात त्यांनी प्रकल्पांना संमती, भूमींचे वाटप, व्यावसायिक व्यवहार आणि इतर शासकीय कामे यांमध्ये अपप्रकार करून लाभ मिळवून दिला.

संपादकीय भूमिका

भारतात लाचखोरांना अशी शिक्षा कधी होणार ?