
मुंबई – ८ जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती किमान पुढील १० दिवस कायम राहील. या कालावधीत राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा न्यून पाऊस अपेक्षित आहे. राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या उत्तरार्धात पूर्वार्धाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अल्प राहू शकते. शेतकर्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे. राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, तिथे शेतकर्यांनी भूमीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याविना पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केले आहे.
कबुतरांद्वारे पसरणार्या फुफ्फुसांच्या व्याधींविषयी तज्ञांची समिती स्थापन करावी ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा
वर्धा येथील ‘गोरस भंडारा’वरील ‘एफ्.डी.ए.’ची कारवाई अवैध !
संगम माहुलीच्या (सातारा) पुलावरून नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास !
‘गोकुळ’च्या अपकिर्तीच्या विरोधात आज शेतकर्यांसमवेत आत्मक्लेश आंदोलन ! – डॉ. युवराज येडूरे, सामाजिक कार्यकर्ते
मावळ तालुक्यातील विसापूर दुर्गावर सापडली अपरिचित लेणी !
धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव आणि नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध !