ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पर्यटकांवर बंधने !

ठाणे – जिल्ह्यात मुसळधार पावसाची चेतावणी देण्यात आल्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना किल्ले, धबधबे, धरणे, तलाव आणि नद्या यांच्या ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे.

भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच ताशी ७० ते ८० कि.मी. वेगाने वारे वाहू शकतात. गेल्या ३ दिवसांत ठाण्यातील अनेक भागांत पाणी साचणे, झाडे पडणे आणि वाहतूककोंडी यांसारख्या समस्या उद्भवल्या आहेत.