राजभवनात पोलीस हवालदाराची आत्महत्या !

मुंबई – येथील राजभवनात कर्तव्य बजावणारे पोलीस हवालदार कौस्तुभ सांगळे यांनी स्वतःच्या बंदुकीने गोळी मारून घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या वेळी आतमध्ये मुंबई पोलीस अधिकारीही तैनात होते. घटनास्थळी पोलिसांनी एक चिठ्ठी सापडली. त्यात प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे त्यांनी आत्महत्या केली, असे लिहिले आहे.