
जकार्ता (इंडोनेशिया) – देशात भारतीय वंशाच्या एका उद्योगपतीने अमेरिकी गुप्तहेर संस्था ‘सीआयए’चा हस्तक बनून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘इंडोनेशियातील वरिष्ठ अधिकार्यांशी संबंध निर्माण करून त्याने अब्जावधी डॉलर्सचे संरक्षण करार मिळवले होते’, असे म्हटले जात आहे. गौरव श्रीवास्तव असे या आरोपी उद्योगपतीचे नाव आहे. त्याने इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्राबोवो सुबियांतो ज्या काळात देशाचे संरक्षणमंत्री होते, तेव्हा त्यांच्याशी मैत्री केली होती. या दोघांमधील संबंध इतके भक्कम होते की, प्राबोवो यांनी गौरव श्रीवास्तवला ‘मिस्टर जी’ असे टोपणनाव दिले होते. प्रारंभीच्या करारांमध्ये लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, वाहतूक विमाने आणि सैनिकी कमांड सिस्टम खरेदी करण्यावर सहमती झाली होती.
🚨 'CIA Agent' or Master Conman?
Indian-origin businessman Gaurav Srivastava allegedly posed as a CIA operative to gain access to Indonesia's top leadership and secure billions in defence deals.
Investigators say he infiltrated the inner circle of President Prabowo Subianto… pic.twitter.com/zYdD5DKHSa
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 8, 2026
श्रीवास्तवने असा दावा केला होता की, त्याचे प्राबोवो सुबियांतो यांच्या घरी वारंवार येणे-जाणे होते आणि तो तिथे मुक्कामही करायचा. तसेच प्राबोवो यांना अमेरिकेच्या काळ्या सूचीतून बाहेर काढण्यातही त्याने मोठी भूमिका बजावली होती.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
संपादकीय : ग्राहकांच्या अधिकारांचे रक्षण !
पाकव्याप्त काश्मीरमधील जनआंदोलन आणि भारताची रणनीती !
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस