‘२१.३ ते ३०.३.२०२६ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘आध्यात्मिक विकास शिबिर’ झाले. शिबिरात सहभागी झालेल्या साधिकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. सौ. श्वेता गडकरी, बेळगाव
१ अ. भावजागृती प्रयोगात सांगितल्याप्रमाणे साधिकेने भगवंताला प्रार्थना करणे : ‘२४.३.२०२६ या दिवशी शिबिरात श्री. संदीप शिंदे यांनी नामजपाच्या संदर्भात एक भावजागृतीचा प्रयोग सांगितला. त्यांनी सांगितले, ‘‘आपण प.पू. डॉक्टरांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) खोलीत बसून नामजप करत आहोत आणि त्यांच्या चरणांशी बसून नामरूपीपुष्प त्यांना अर्पण करत आहोत’, असा भाव ठेवूया.’’ त्यांचे हे बोलणे ऐकून मी प्रार्थना केली, ‘हे भगवंता, माझ्याकडून अंतर्मनापासून नामजप होऊ दे. मी करत असलेला नामजप तुझ्या चरणांवर पुष्परूपात अर्पण होऊ दे.’
१ आ. भगवंताला प्रार्थना करून नामजपाला आरंभ केल्यावर सूक्ष्मातून दिसलेले दृश्य : मी भगवंताला प्रार्थना करून नामजपाला आरंभ केला. त्या वेळी मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले, ‘मला अयोध्येतील श्रीराम दिसून तेथील प्रभु श्रीरामाचे चरण दिसले. त्या चरणांवर मी पुष्प अर्पण करत आहे. नंतर ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोघी प.पू. गुरुमाऊलींच्या चरणांवर पुष्प अर्पण करत आहेत’, असे दिसले.
१ इ. नामजप करत असतांना डोळ्यांतून भावाश्रू येणे : मी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत असतांना माझी भावजागृती झाली. माझ्या डोळ्यांतून अश्रू येत होते. नामजप झाल्यावर कृतज्ञता व्यक्त केली आणि माझ्या डोळ्यांतून येणारे अश्रू थांबले.’
२. सौ. राधिका गिरीश कुलकर्णी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
अ. प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांनी मला स्वप्नात दर्शन दिले होते. त्यांनी पांढरे धोतर आणि पांढरे उपरणे परिधान केले होते. आम्ही सर्व साधक रांगेत उभे राहून त्यांचे दर्शन घेत होतो.
आ. मला हे स्वप्न पडल्यानंतर ६ मासांनी मला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात शिबिरासाठी जायचे आहे’, असे समजले. तेव्हा मला ६ मासांपूर्वी पडलेल्या स्वप्नाचा कार्यकारणभाव लक्षात आला. मला वाटले, ‘या वैकुंठभूमीत येऊन माझे आयुष्य पालटणार आहे.’
इ. मला या शिबिराला येऊन ‘सेवा परिपूर्ण कशी करावी ?’, हे शिकायला मिळाले.’
३. सौ. स्नेहल सोवनी, जिल्हा सांगली
३ अ. डोळे मिटून ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत असतांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्य : ‘२६.३.२०२६ या दिवशी ‘रामनवमी’ होती. मी दुपारी डोळे मिटून ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत असतांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘एक पिवळसर सोनेरी गोळा आहे. सर्व साधक हात जोडून त्या गोळ्याकडे जात आहेत. प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) सगळ्या साधकांकडे अत्यंत करुणामय नेत्राने पहात आहेत.’ हा प्रसंग पाहिल्यावर मला प.पू. गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि माझे मन पुष्कळ प्रसन्न झाले.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ३०.३.२०२६)
हे म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी !
सुख-दु:खाच्या जीवनात आनंदप्राप्तीचे सत्य !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ‘डॉक्टर’ असूनही अध्यात्माकडे वळले, यामागील अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
प.पू. भक्तराज महाराज यांची अमृतमय शिकवण
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या संदर्भात सद्गुरु अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव यांचे दैवी कार्य !
व्यक्ती-स्वातंत्र्यवाल्यांचे हे अज्ञानच !