
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : पृथ्वीवरील सर्व विषयांचे ज्ञान मर्यादित आहे; पण अध्यात्माचे ज्ञान अमर्याद आहे; म्हणून मी ‘डॉक्टर’ होऊनही अध्यात्माकडे वळलो. यासंदर्भात माहिती हवी. (२९.५.२०२६)
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये
१ अ. तीव्र जिज्ञासा असणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ‘संमोहन उपचारतज्ञ’ आहेत. ते पूर्वी ‘संमोहन उपचारतज्ञ’ म्हणून कार्यरत असतांना संमोहन उपचाराने बरे न झालेले काही रुग्ण आध्यात्मिक उपायांनी, म्हणजे विशिष्ट देवतेची उपासना करणे, श्राद्धविधी करणे इत्यादींमुळे बरे झाले होते. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ‘रुग्णांना येणार्या विविध समस्यांमागे ‘शारीरिक’ आणि ‘मानसिक’ या कारणांच्या समवेत ‘आध्यात्मिक’ कारणही आहे’, हे ओळखले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी काही रुग्णांचे आजार बरे न होण्यामागील काही कारणे ‘पूर्वजांचे त्रास, वास्तूदोष, प्रारब्ध, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी आध्यात्मिक कारणे आहेत’, हे जाणले. तेव्हा त्यांच्यात बुद्धीपलीकडील सूक्ष्म अध्यात्म जाणून घेण्याची तीव्र जिज्ञासा निर्माण झाली. तेव्हा त्यांनी ‘सध्या मनुष्याला ठाऊक असलेल्या ज्ञानाच्या मर्यादा आणि ईश्वराचे अनंत ज्ञान अन् सामर्थ्य’ स्वीकारले. असे करणे त्यांना ‘जिज्ञासा, अभ्यासू वृत्ती आणि अहं अल्प असणे’, यांमुळे शक्य झाले.
१ आ. ‘व्यक्तीचे जीवन स्थूल जगापुरते मर्यादित नसून ते सूक्ष्मही आहे’, हे जाणणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी रुग्णांच्या समस्यांवरील मूळ उपाय शोधतांना ‘व्यक्तीचे जीवन स्थूल जगापुरते मर्यादित नसून त्यामागे अदृश्य असे सूक्ष्म जग आहे’, हे ओळखले. यासाठी त्यांनी ‘व्यक्तीने सूक्ष्म जग जाणून घेणे महत्त्वाचे आहे’, हे समजून घेतले.
२. जिज्ञासा जागृत होणे, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे ‘अवतारत्व’ जागृत होत असल्याचे लक्षण असणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांमध्ये मुळातच जिज्ञासू वृत्ती होती; मात्र कालांतराने ही जिज्ञासा ‘अध्यात्म आणि सूक्ष्म जग’ जाणून घेण्याकडे वळली. या जिज्ञासेने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना प्रथम ईश्वरप्राप्तीपर्यंत नेले आणि त्यानंतर त्यांच्या अवतारी कार्याला प्रारंभ झाला. यावरून ‘अध्यात्मातील जिज्ञासा जागृत होणे’, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे ‘अवतारत्व’ जागृत होत असल्याचे लक्षण आहे, हे समजते.
प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना मिळाले ज्ञान !

अध्यात्म जाणून घेण्यासाठी संतांकडे नियमित जाणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांमध्ये जिज्ञासा असल्याने त्यांच्या मनात प्रारंभी अध्यात्माविषयी अनेक प्रश्न होते. अनेक संतांनी त्या प्रश्नांची उत्तरे दिली. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना ‘अध्यात्म सूक्ष्म, अचूक आणि परिपूर्ण शास्त्र आहे’, याचे ज्ञान झाले. त्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी अध्यात्माचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी काही संतांकडे नियमित जाण्यास प्रारंभ केला.
अ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी जीवन समर्पित करणे : प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना ‘मनुष्यजन्माचे ध्येय ‘ईश्वरप्राप्ती’ आहे, अध्यात्मातील मूलभूत सिद्धांत, तसेच ईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धन यांच्या त्यागाचे महत्त्व’ हे सर्व शिकायला मिळाले.
अध्यात्माचा अभ्यास करतांना ‘एकेका विषयाचे ज्ञान प्राप्त करण्यास अनेक वर्षे लागतात; परंतु ईश्वरप्राप्ती झाल्यावर सर्वच विषयांचे ज्ञान प्राप्त होते’, हे समजल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी व्यावहारिक जीवन त्यागून त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी स्वतःला समर्पित केले.
आ. प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडून प्रथम व्यष्टी आणि नंतर समष्टी साधना करण्याची प्रेरणा मिळणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडून अध्यात्मातील अनेक पैलू शिकायला मिळाले. त्यानुसार सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी अध्यात्म कृतीत आणले. त्यामुळे त्यांना गुरूंच्या आशीर्वादाने ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांची प्राप्ती झाली. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना
प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडून प्रथम व्यष्टी आणि नंतर समष्टी साधना करण्याची प्रेरणा मिळाली.
३. स्थूल जग संपून सूक्ष्म जगाचा प्रारंभ होणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर अध्यात्माकडे वळले, तेव्हा त्यांचे स्थुलातील व्यावहारिक आणि सांसारिक जीवन संपून त्यांच्या सूक्ष्म अशा आध्यात्मिक जीवनाला प्रारंभ झाला.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ‘डॉक्टर’ होऊनही अध्यात्माकडे वळल्याने त्यांना झालेले लाभ

४ अ. अल्प कालावधीत साधनेत प्रगती साध्य होणे : ‘गुरु प.पू. भक्तराज यांचा आशीर्वाद आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी केलेली साधना’ यांमुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना अल्प कालावधीत साधनेत प्रगती साध्य करता आली.
४ आ. सर्व प्रकारच्या समस्यांचे अचूक निदान करता येणे : जिज्ञासू, हितचिंतक, राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी आणि साधक यांना साधना करतांना अनेक समस्या येतात. प्रत्येक समस्येमागील कारण भिन्न असते. काही समस्या गुंतागुंतीच्या असतात, तरीही सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर अंतर्ज्ञानाने त्या ‘समस्या शारीरिक, मानसिक कि आध्यात्मिक कारणामुळे निर्माण झाली आहे ?’, हे ओळखतात आणि त्यावर उपाय सांगतात. त्यामुळे व्यक्तीच्या साधनेतील समस्या सुटून तिच्या साधनेला चालना मिळते.
४ इ. सर्वच क्षेत्रांतील साधकांना मार्गदर्शन करता येणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना साधनेमुळे ईश्वरस्वरूप प्राप्त झाले आहे. ईश्वर सर्वज्ञ आहे. त्यामुळे त्यांना कला, बांधकाम, वैद्यकीय, आश्रम व्यवस्थापन, ज्योतिष, अध्यात्म अशा सर्वच क्षेत्रांतील साधकांना मार्गदर्शन करता येते.
४ ई. अस्तित्वाने कार्य करता येणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देहाद्वारे देश-विदेशांत चैतन्याचे प्रक्षेपण होत असते. त्यामुळे साधक कुठेही असला, तरीही त्याला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांकडून सूक्ष्मातून साहाय्य मिळते.
४ उ. धर्मकार्यातील अडथळे दूर करता येणे : सप्तपाताळांतील वाईट शक्ती सूक्ष्मातून ‘साधकांची साधना आणि धर्मकार्य’ यांत अनेक अडथळे निर्माण करतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देहाद्वारे प्रक्षेपित होत असलेल्या चैतन्यामुळे हे अडथळे दूर होण्यास साहाय्य होते. परिणामी साधकांची साधना आणि धर्मकार्य सुरळीतपणे चालू रहाते.
५. समाजाला आध्यात्मिक जीवनाचे महत्त्व शिकवणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी उत्तम व्यावहारिक जीवनाचा त्याग करून अध्यात्माला वाहून घेतले. यातून त्यांनी स्वतःच्या कृतीद्वारे ‘आध्यात्मिक जीवनाचे महत्त्व आिण अपरिहार्यता’, समाजाला शिकवली.
६. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांच्याकडून साधकांना पूर्णवेळ आध्यात्मिक जीवन जगण्याची प्रेरणा मिळाल्याने अनेकांची आध्यात्मिक उन्नती होणे
‘व्यावहारिक जीवनातून आध्यात्मिक जीवनाला कलाटणी मिळणे’, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांच्या अवतारी कार्याचाच एक भाग आहे. असे घडल्याने शेकडो साधकांना व्यावहारिक जीवन त्यागून पूर्णवेळ आध्यात्मिक जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली. परिणामी अनेक साधक साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले, तर काही साधकांनी ‘संत पद’, तसेच काहींनी ‘सद्गुरु पद’ आणि ‘परात्पर गुरु पद’ गाठले.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : ३.६.२०२६, वेळ : सकाळी ११, कालावधी : १ मिनिट)
हे म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी !
७ जुलै : सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा दिनांकानुसार जन्मोत्सव
सुख-दु:खाच्या जीवनात आनंदप्राप्तीचे सत्य !
सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने साधिकेला झालेले लाभ !
साधकांच्या आध्यात्मिक आई सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव !
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘आध्यात्मिक विकास शिबिरा’त साधिकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !