साधकांच्या आध्यात्मिक आई सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव !

‘सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव या धर्मप्रचारक आहेत. दोघीही श्री गुरूंच्या चरणी एकरूप झाल्या आहेत. मला साधनेत त्यांनी पदोपदी केलेले साहाय्य आणि अनुभवलेली त्यांची प्रीती याविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

सद्गुरु अनुराधा वाडेकर

१. साधक रुग्णाईत असतांना त्याची काळजी घेणे 

‘एकदा मी पाय घसरून प्रसाधनगृहात पडलो होतो. तेव्हा माझ्या कानाच्या मागील बाजूस दुखापत झाली होती. मला रुग्णालयात भरती केले होते. माझ्या कानाच्या मागे टाके घालावे लागले होते. त्या वेळी माझ्यासाठी साधक उपलब्ध करून देऊन सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी माझी काळजी घेतली.

२. प्रीती  

पू. (सौ.) संगीता जाधव

सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या खोलीत मला सेवेनिमित्त अनेक वेळा जाण्याची संधी मिळते. त्या दोघींना जेवणात काही पथ्ये आहेत. त्यांना काही वेळा फळे किंवा फळांचा रस घ्यावा लागतो. त्या वेळी त्या दोघी खोलीत असलेल्या साधकांनाही फळे किंवा फळांचा रस देतात.

श्री. बळवंत पाठक

३. ‘साधकांनी साधनेच्या पुढच्या टप्प्यात जावे’, या दृष्टीने मार्गदर्शन करणे 

आई-वडील आपल्या मुलांची सर्वतोपरी काळजी घेऊन त्यांना घडवतात, त्याचप्रमाणे ‘सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव या ‘साधकांनी साधनेच्या पुढच्या टप्प्यात जावे’, यासाठी साधकांना मार्गदर्शन करत असतात. ‘साधकांना लवकरात लवकर ईश्वरप्राप्ती व्हावी’, असा त्यांचा अखंड ध्यास असतो. त्यामुळे ‘सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव या साधकांच्या आध्यात्मिक आई आहेत’, असे मला वाटते.’

– श्री. बळवंत पाठक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४२ वर्षे), ठाणे सेवाकेंद्र (२३.६.२०२६)