
बहादूरगड (हरियाणा) – हरियाणा आणि देहली पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गुंड लॉरेन्स बिश्नोई टोळीतील प्रवेश अन् हिमांशू हे २ गुंड येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. हे दोघे जण एका व्यायामशाळेच्या संचालकाच्या हत्येच्या प्रकरणात पसार होते. त्यांना पकडून देणार्यांना हरियाणा पोलिसांनी प्रत्येकी १ लाख रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा यापूर्वी केली होती. या चकमकीत देहली पोलिसांचा एक हवालदारही घायाळ झाला असून त्याच्यावर उपचार चालू आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना घेरून आत्मसमर्पण करण्यास सांगितले; मात्र त्यांनी पोलिसांवरच गोळीबार केला. त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात दोघे गंभीर घायाळ झाले. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
फरीदाबाद (हरियाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पार पडले ‘स्वसंरक्षण’विषयक व्याख्यान अन् प्रशिक्षण !
जुन्या बँक खात्यांमधील पडून राहिलेले पैसे परत मिळवा ! – भारतीय रिझर्व्ह बँक
भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमध्ये सामंजस्य करार
Zeenat Ibrahim Arrested : भूमी खरेदीच्या व्यवहारात फसवणूक करणार्या मुसलमान महिलेला अटक
Mobile Torch For Bus : भ्रमणभाषच्या टॉर्चच्या प्रकाशात ९० कि.मी. बस चालवली !
‘ताजमहाल’ हे ‘तेजोमहालय’ असल्याचे सिद्ध होण्यासाठी सर्वेक्षण करा !