चौकुळ गावात मुसळधार पावसासह चक्रीवादळामुळे अनेक घरांची हानी

सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वार्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. याचा सर्वांधिक फटका सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावातील महार्टवाडी-बेरडकी येथे ३ जुलैच्या उत्तररात्री अनुमाने ३ वाजता बसला. मुसळधार पावसासह आलेल्या चक्रीवादळाने काही क्षणांतच अनेक घरांवरील सिमेंटचे पत्रे आणि कौले उडून गेली, तर एक घर पूर्णत: कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
महार्टवाडी- बेरडकीतील बहुतांश घरे ७० ते ८० वर्षे जुनी, मातीची आणि कौलारू असल्याने वादळाचा सर्वाधिक फटका या घरांना बसला. यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. विशेष म्हणजे अनेक घट्यांनंतरही शासकीय यंत्रणा गावात पोचली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने आम्हाला साहाय्य करावे, अशी मागणी हानीग्रस्तांनी केली आहे.
आंबोली घाटातील प्रसिद्ध सनसेट पॉईंट परिसरात ३ दिवसांपूर्वी डोंगरकड्यावरून एक भलामोठा दगड, तसेच माती रस्त्यावर कोसळली. ३ दिवसांनंतरही हा दगड, दगडांचा ढिगारा आणि माती अद्यापही हटवण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
कोलगाव येथे ४ जुलैला दुपारी एका धावत्या डंपरवर (मालवाहतूक ट्रक) अचानक रस्त्याच्या कडेचे मोठे झाड कोसळले. या घटनेत डंपरची हानी झाली; मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. डंपर चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कुणालाही दुखापत झाली नाही.
दोडामार्ग शहरातील केळीचे टेंब परिसरात ३ जुलैला दुपारपासून रात्रीपर्यंत वीजपुरवठा पूर्णपणे खंडित होता. त्यानंतरही वारंवार वीजप्रवाह खंडित होत राहिल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
शिरोडा येथील कॅथॉलिक बँकेसमोरील बगलमार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी, तसेच पादचार्यांसाठी जिकिरीचे झाले आहे. येथील परिसर चिखलमय झाला आहे.
अरुणा नदीकाठच्या गावांना सावधानतेची चेतावणी
सिंधुदुर्गनगरी – वैभववाडी तालुक्यातील अरुणा धरणातील पाण्याची पातळी वाढली असल्याने कुठल्याही क्षणी धरणातील पाण्याचा विसर्ग (धरणातील पाणी बाहेर पडणे) अरुणा नदीत चालू होऊ शकतो. त्यामुळे ४ जुलैपासून पावसाळी हंगाम संपेपर्यंत नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी केव्हाही वाढण्याची शक्यता असल्याने जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी नदीपात्रात उतरू नये आणि सावधानता बाळगावी, असे आवाहन मध्यम प्रकल्प विभागीय पथकाचे उपकार्यकारी अभियंता रूपेश चव्हाण यांनी केले आहे.
केंद्रशासनाकडून म्हादई जलतंटा लवादाला आणखी १ वर्षाची मुदतवाढ
आल्त पर्वरी येथे ७ बंगल्यांमध्ये चोरी
कुडचडे येथे ४ ठिकाणी चोरीचा प्रयत्न
पार्से येथील एका व्यक्तीची ४ लाख २६ सहस्र रुपयांची ऑनलाईन फसवणूक
महाबळेश्वरमधील नावली गावातील भूमी अतीवृष्टीमुळे खचली !
‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संवर्धन आराखड्यां’तर्गत ४ मंदिरांतील मूर्तींची आज प्राणप्रतिष्ठा !