अज्ञात व्यक्तीने बँक कर्मचारी असल्याचे भासवून पैसे लुबाडले

पेडणे, ४ जुलै (वार्ता.) – पेडणे तालुक्यातील वाईडोंगर-पार्से येथील दिगंबर रामचंद्र पेटकर यांची एका अज्ञात व्यक्तीने स्वतःला इंडसइंड बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून ४ लाख २६ सहस्र ७९९ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी त्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील अन्वेषण चालू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिगंबर रामचंद्र पेटकर यांना १ मेच्या मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीचा दूरभाष आला. त्या व्यक्तीने आपण इंडसइंड बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून पेटकर यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्या व्यक्तीने पेटकर यांना एक ऑनलाईन अर्जाची लिंक पाठवून तो भरण्यास प्रवृत्त केले. अर्ज भरल्यानंतर त्या व्यक्तीने व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून चातुर्याने पेटकर यांच्या बँक खात्याचा गोपनीय असलेला ओटीपी (तात्पुरता संकेतशब्द) आणि सुरक्षा कोड (गोपनीय संकेतशब्द) मिळवला आणि पेटकर यांच्या खात्यातून परस्पर ४ लाख २६ सहस्र ७९९ रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पेटकर यांनी पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी २ जुलै २०२६ या दिवशी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. कोणत्याही बँकेचे अधिकारी ग्राहकांकडे दूरभाषवरून संकेतांक किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती मागत नाहीत. नागरिकांनी अशा सायबर गुन्हेगारांपासून सावध रहावे आणि अनोळखी दूरभाषना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मराठी आणि कोकणी या भाषांचे सहअस्तित्व महत्त्वाचे !
केंद्रशासनाकडून म्हादई जलतंटा लवादाला आणखी १ वर्षाची मुदतवाढ
गोव्यात वीजवितरणाचे काम टाटा पॉवर आस्थापनाला दिलेले नाही ! – सुदिन ढवळीकर, वीजमंत्री
Zeenat Ibrahim Arrested : भूमी खरेदीच्या व्यवहारात फसवणूक करणार्या मुसलमान महिलेला अटक
Bishnoi Gang Encounter : बिश्नोई टोळीतील २ गुंड पोलीस चकमकीत ठार
आल्त पर्वरी येथे ७ बंगल्यांमध्ये चोरी